शिराळा शहर राष्ट्रीय तीर्थक्षेत्र दर्जा देऊन,पायाभूत सुविधा,विकास निधीची तरतूद करावी.. खासदार धैर्यशील माने यांना निवेदन.

शिराळा प्रतिनिधी
जगप्रसिद्ध नागपंचमी सणाची परंपरा असणाऱ्या शिराळा शहरास राज्य राष्ट्रीय तीर्थक्षेत्र व सणाचा दर्जा देऊन पायाभूत सुविधा विकास निधीची तरतूद करणे बाबत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना ऍडव्होकेट सम्राट शिंदे व सत्यजित कदम यांनी दिल्ली येथे निवेदन दिले व या संदर्भात आपण राज्य व केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी विनंती केली
शिराळा नागपंचमीच्या सणास खासदार धैर्यशील माने विधानसभेचे आमदार सत्यजित देशमुख तसेच मा सम्राट महाडिक जिल्हा अध्यक्ष भाजपा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त होत आहे या पार्श्वभूमीवर शिराळा शहरांमध्ये स्वच्छता सुरक्षितता व तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टिकोनातून निवेदन देण्यात आले
शिराळा शहरास पौराणिक व थोर ऐतिहासिक वारसा आहे गुरु गोरक्षनाथ अंबामाता यांच्यापासून चालत आलेली नागपंचमी सणासाठी राज्यातून तसेच राज्याबाहेरून तसेच परदेशातून विशेष पर्यटक येत असतात येथील असणाऱ्या सणाच्या जिवंत नागाच्या पूजेसाठी नागपंचमी जगप्रसिद्ध आहे याची पार्श्वभूमी व महत्त्व पाहता शिराळा शहराचा विकास होणे अपेक्षित आहे यासाठी शिराळा शहरातील स्वच्छता पायाभूत विकास यासाठी राज्य व राष्ट्रीय तीर्थक्षेत्र घोषित होणे होऊन यामुळे विशेष निधीची तरतूद होईल तसेच शिराळा शहर हे आंतरराष्ट्रीय महामार्गापासून केवळ अठरा किमी अंतरावर असून शहरास विविध राष्ट्रीय मार्गाने जोडणे अपेक्षित आहे यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे पर्यटकांची वाढती गर्दी पाहता शिराळा शहराच्या पायाभूत विकासासाठी हे निवेदन देण्यात आले यावेळी ऍड सम्राट शिंदे सत्यजित कदम रोहित पाटील विश्वजीत कदम अनिल माने ओंकार शिंदे विलास कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते