ताज्या घडामोडी
सुरूल (ता. वाळवा) येथे माजी आमदार मानसिगराव नाईक यांचा येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार……

प्रतिनिधी : – बापूसाहेब कांबळे
सुरुल येथील पिराचा माळ भागातील नागरिकांनी आज (ता. 26) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करून आभार मानले. पिराचा माळ येथे स्वतंत्रपणे शंभर के. व्ही. क्षमतेचा डीपी बसवून तेथून विजेची सोय करावी, अशी येथील नागरिकांची मागणी होते. त्यावर श्री. मानसिंगभाऊ यांनी लोकप्रतिनिधी असताना प्रयत्नाने डीपी मंजूर झाला होता. तो तूर्तास कार्यान्वित झाला आहे. डीपी बसल्यामुळे शंभर घरांतील विजेचा प्रश्न मिटला, म्हणून पिराचा माळ येथील नागरिकांनी आज सत्कार केला. या प्रसंगी राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक बंडोपंत नांगरे, सर्जेराव पाटील, धनाजी पाटील, श्रीरंग मदने आदी मान्यवर उपस्थित होते.