ताज्या घडामोडी

एक ऑक्टोबर जेष्ठ नागरिक दिनानिमित्त पू साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळात 75 वय पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांचा केला सन्

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील *एक ऑक्टोबर जेष्ठ नागरिक दिनानिमित्त पू साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळात 75 वय पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांचा केला सन्मान.. पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर येथे एक ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व साने गुरुजींचे प्रतिमा पूजन प्रमुख पाहुणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते व मंडळाचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील,सचिव एस एम पाटील व संचालक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केला तदनंतर पाहुण्यांचा परिचय मंडळाचे सचिव शिवाजीराव मोहन पाटील यांनी केला ज्या ज्येष्ठ नागरिकांचे 75 वय पूर्ण केलेले आहे व त्यापुढील वय असलेले 38 जेष्ठ नागरिकांचा प्रत्येकी शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच नारी रत्न पुरस्कार प्राप्त सौ रजनी पाटील व समजभूषण पुरस्कार प्राप्त श्रीमती पूजा पाटील यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला प्रास्ताविकात आण्णा साहेब यांनी मंडळाला पडणारा अपुरा हॉल व बाहेरील ग्राउंड यात मुरूंमाची पिचिंग तसेच पाण्याच्या बोरवेल असावा असे मागणी करण्यात आली प्रमुख पाहुणे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार जी नेरकर यांनी त्यांच्या भाषणात मला जे जे शक्य होईल ते कार्य मी पू साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळासाठी करेल आणि करत राहील त्याचबरोबर बाहेर ग्राउंड साठी मुरमाची व्यवस्था ही करण्याचं आश्वासन दिल आपला ज्येष्ठ नागरिक संघ हा आदर्श संघ आहे त्याबद्दल त्यांनी त्यांच्या तोंडून संघास धन्यवाद दिलेत नवरात्र उत्सवातील नवमीचा दिवस असल्याने शक्तीपीठे कशी तयार झाली याबाबत मार्गदर्शन आख्यायिका एस एम पाटील यांनी कथन केली माँ जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या व आपल्या सदस्य असलेल्या नऊदुर्गांचा सन्मान देखील प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने करण्यात आला प्रार्थना श्रावण पाटील यांनी सादर केले सूत्रसंचालन मंडळाचे सचिव एस एम पाटील यांनी केले उपस्थितांनी नाश्त्याचा आस्वाद घेतला व अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्या बाबत सचिव यांनी जाहीर केले याच कार्यक्रमात 11 ऑक्टोबर व 12 ऑक्टोgबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाची ही सविस्तर माहिती देण्यात आली महिला भगिनी ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास हजर होत्या.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??