मुरूमच्या किसान गणेश मंडळाकडून प्रशालेला शैक्षणिक उपक्रम इस्रो चांद्रयानाची प्रतिकृतीची भेट

मुरूम, ता. उमरगा, ता. ३० (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्ह्यातील मानाचा आजोबा गणपती म्हणून सुपरिचित असलेल्या किसान गणेश मंडळ, मुरूम च्या शैक्षणिक उपक्रम इस्रो चांद्रयानाची प्रतिकृती तयार करून विध्यार्थ्यांना वैज्ञानिक अभ्यासक्रमात मोलाचे मार्गदर्शन ठरेल यासाठी मुरूम शहरातील किसान गणेश मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेत भारतीयांच्या अभिमानास्पद घडलेली म्हणजेच इस्रो चंद्रयांनाची यशस्वी उड्डाणं केलेली प्रतिकृती भेट देण्यात आली. ही भेट पुढील वैज्ञानिक शिक्षणासाठी मार्गदर्शक ठरणार याच हेतुने किसान गणेश मंडळाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला आहे. मंडळाचे जेष्ठ सदस्य अल्लीमामा कोतवाल व उमाकांत जाधव यांच्या हस्ते या चंद्रयांनाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने व पूर्ण टीम, मंडळाचे सहसचिव संदीप बाबळसुरे, सदस्य प्रल्हाद (भगत) माळी, शंकर थोरात, नितीश राजपूत, वाघ्या माळी, अक्षय राजपूत, दादा व्हनाळे, ओम चिलोबा, शुभम टेकाळे, अक्षय राजपूत, मासूलदार, रविराज राजपूत, गणेश सराफ, शुभम राजपूत, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत किसान गणेश मंडळाला पुढील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमासाठी याबद्दल काही नागरिकांनी शुभेच्छा ही दिल्या.