ताज्या घडामोडी

पालघर नगर परिषद आयोजित स्वच्छता इनोव्हेटिव टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२५ प्लास्टिक कचऱ्यावर प्रभावी उपाय सादर करत सेंट जॉन कॉलेजचा “प्रथम क्रमांक

पालघर ता.२

पालघर नगर परिषद आणि सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता इनोव्हेटिव टेक्नॉलॉजी चॅलेंज २०२५ या स्पर्धेमध्ये सेंट जॉन इंटरनॅशनल इंजीनियरिंग कॉलेजच्या डिग्रीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पनांमध्ये “इन्सिनरेशन: प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत उपाय” या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला.या अभिनव प्रकल्पामध्ये आदित्य सिंग, ऋत्वी पाटील , कार्तिक पिंपळे, प्रगती यादव, वैभव सोमण आणि विधी जैन या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण समस्या — प्लास्टिक कचरा — यावर शाश्वत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय सादर केला.

त्यांच्या सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले की, प्लास्टिकचे नैसर्गिक विघटन शेकडो वर्षे घेत असल्याने इन्सिनरेशन — म्हणजेच उच्च तापमानावर प्लास्टिक जाळणे — हा एक प्रभावी उपाय ठरतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या विषारी वायूंचे नियंत्रण शक्य असून, स्क्रबर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फिल्टर्स, अ‍ॅक्टिवेटेड कार्बन यंत्रणा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करता येते.

विशेष म्हणजे, इन्सिनरेशननंतर उरलेली राख वापरून पर्यावरणपूरक विटा तयार केल्या जाऊ शकतात. यामुळे केवळ कचऱ्याचे व्यवस्थापनच होत नाही, तर त्या कचऱ्याचे मूल्यवर्धन करून पुनर्वापरही शक्य होतो.परीक्षकांकडून या संकल्पनेचे विशेष कौतुक झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेला दृष्टिकोन केवळ पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे, तर हरित भारत आणि स्वच्छ भारत अभियानास चालना देणारा ठरला.या स्पर्धेद्वारे नव्या पिढीतील सर्जनशीलतेला आणि सामाजिक भानाला एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, अशा उपक्रमांमुळे पर्यावरण पूरक भविष्यासाठी भक्कम पाया तयार होत आहे.पालघर नगर परिषद व सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेच्या स्पर्धकांच्या अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??