ताज्या घडामोडी

पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिना निमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील *पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचा वर्धापन दिना निमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न* ज्येष्ठांचा केला सन्मान पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर येथे 11 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी महिला व पुरुष सहभागी होऊन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व दिनांक 12 ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण समारंभ वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली 12 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व साने गुरुजींचे प्रतिमा पूजन माल्यार्पण प्रमुख पाहुणे सुधाकर बंडू येवले वाणी यांच्या हस्ते व मंडळाचे अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील,सचिव एस एम पाटील व संचालक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केला तदनंतर पाहुण्यांचा परिचय मंडळाचे सचिव शिवाजीराव मोहन पाटील यांनी केला प्रमुख पाहुणे श्री सुधाकर बंडू येवले यांनी त्यांच्या भाषणात अध्यात्मिक कार्य व पर्यावरणाच्या संदर्भात महत्त्वाचे वृक्ष त्यांचे नुसते पूजन करून नाहीतर वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धन करावे त्याचे महत्त्व पटवून दिले अमळनेरचे श्री संत सखाराम महाराज संस्थानातील ते विश्वस्त राहिले असल्याने त्यांचे लिखित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात देखील आलं प्रत्येक सभासदाला अध्यात्मिक पुस्तकाचे वाटप करण्यात आल ज्या ज्येष्ठ नागरिकांनी जलद चालणे, गीत गायन, संगीत खुर्ची,रांगोळी, स्पर्धा लिंबू चमचा यांच्यात प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळवला होता त्या विजेत्या जेष्ठ नागरिकांचा प्रत्येकी बक्षीस वाटप करण्यात. ज्या ज्येष्ठांचे वाढदिवस होते त्यांचाही सन्मान करण्यात आला नंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत सुरुवात करण्यात आली सुरुवातीला दिवंगत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वर्षात पू साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर तर्फे राबवलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची माहिती व संस्थेत आतापर्यंत असलेले सभासद संख्या याची माहिती सचिव एस एम पाटील यांनी दिली व कोषाध्यक्ष डी व्ही बिरारी यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले संस्थेला एडिट मध्ये “अ ” वर्ग मिळाला असल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले . त्यात पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचा कार्यकाळ संपला असल्याने नवीन कार्यकारणी निवडीचा विषयासाठी सदस्य 1 देविदास जगताप 2 ए डी पाटील 3 हेमंत कुमार पवार 4 सौ रजनी पाटील 5 मधुकर काशिनाथ वाणी 6 पी एस पाटील यांनी आपले मत मांडलेत संस्थेच्या इतिहासात संस्थेची निवडणूक आतापर्यंत बिनविरोध झालेली आहे त्याकरिता पू.साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळात राजकारण आणू नये,मंडळाचा कार्यकारिणीचा कालखंड जरी संपलेला असला तरी कार्यकारणी सध्याचि चांगलं कार्यकरीत असून, कार्यकारणीत थोडाफार बदल करून विद्यमान अध्यक्ष प्रा शिवाजीराव अवचित पाटील यांना नवीन पाच वर्षासाठी म्हणजे 2026 ते 2030 पर्यंत कार्यकारणी निवडीचे अधिकार देण्यात यावे असा ठराव मांडण्यात आला त्या ठरावास उपस्थित जनरल सभेच्या सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून अनुमोदन दिले सुरवातीला प्रार्थना श्रावण पाटील यांनी सादर केली सूत्रसंचालन मंडळाचे सचिव एस एम पाटील यांनी केले उपस्थितांनी मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी दिलेल्या भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी सूचना देवून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्या बाबत सचिव यांनी जाहीर केले महिला भगिनी ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास हजर होत्या.

 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??