ताज्या घडामोडी

सम्राट” रेस्टॉरंट चे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
शिराळा – कोकरूड मार्गावरील भागाईवाडी फाटा ता.शिराळा येथील सम्राट रेस्टॉरंट या एक्झिक्युटिव्ह हाॅटेल चे उद्घाटन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते झाले.यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजीत देशमुख, वारणा शिक्षण समूहाचे डॉ.प्रतापराव पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व सोयीने युक्त , प्रशस्त आणि निसर्ग रम्य असलेले हे तालुक्यातील पहिले रेस्टॉरंट आहे.
शिराळा तालुक्यातील वाढती पर्यटक संख्या लक्षात घेऊन, सर्व सोयींनी युक्त असे प्रशस्त हाॅटेल शिराळा तालुक्यात सम्राट आणि महेश गायकवाड या तरूणांनी सुरू केले आहे.स्व कर्तृत्ववाने नवी पिढी उद्योग सुरू करत आहे, ही आशादायी चित्र आहे.असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी काढले. शिराळा तालुक्यात औद्योगिक विकासाबरोबरच पर्यटन विकासातून देखील रोजगार निर्मिती होत आहे. असे शिवाजीराव नाईक म्हणाले.शिराळा – कोकरूड मार्गावर शिराळा येथून १० मिनिटांच्या अंतरावर भागाईवाडी फाटा येथे हे प्रशस्त हाॅटेल सुरू झाले आहे. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजीत देशमुख,वारणा समूहाचे प्रमुख डॉ.प्रतापराव पाटील, सुखदेव पाटील, रणधीर नाईक , महेश गायकवाड, सम्राट गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!