ताज्या घडामोडी

सलग नारळ फळबाग लागवड शाश्वत उत्पादन व आर्थिक नफ्याचे गुरु किल्ली- डॉ ढगे

Spread the love

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे संजय ना बदे या शेतकऱ्याने सलग नारळाची फळबाग लागवड केली आहे याची पिक पाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचेमंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी व कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे तसेच कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण सुडकेआणि कृषी सहाय्यक संदीप गायकवाड यांनी केली
याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे म्हणाले की सलग नारळ फळबागेची लागवड निश्चित व शाश्वत उत्पादन देणारी असून आर्थिक लाभ निश्चित होईल नारळाची लागवड पिण्यासाठी पाणी शहाळी व खोबऱ्यासाठी केली जाते आज दोनही उद्दिष्टासाठी केलेल्या नारळाच्या लागवडीला मागणी चांगली आहे त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी श्री नाबदे यांच्या बागेची पाहणी करून अनुकरण करावे याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केले
शेतकरी रामेश्वर देशमुख व संजय नाबदे यांनी माहिती सांगताना विशद केले की आम्ही ग्रीन डार्क या जातीची रोपे कोकणातील देवगड नर्सरी मधून आणलेदोन ओळीतील व रोपातील अंतर 15 फूट ठेवले पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक ठिबक संच बसवले बहुतांशी रासायनिक खते ठिबक सिंचनातून दिले जातात दीड एकरामध्ये चारशे पाच झाडे आहेतबागेची पाहणी केल्यानंतर डॉक्टर ढगे यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!