ताज्या घडामोडी

तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याची थकीत ऊस बिले तात्काळ मिळावीत या मागणीसाठी खा संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Spread the love

तासगाव प्रतिनिधी
तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याची थकीत ऊस बिले तात्काळ मिळावीत या मागणीसाठी खा संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे जो पर्यंत आंदोलक शेतकऱ्याच्या खात्यावर बिले वर्ग होत नाहीत तो पर्यंत हलणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
खराडे म्हणाले तासगाव व नागेबाडी कारखान्याची ऊस बिले 48 कोटीची ऊस बिले थकीत होती त्या पैकी 30 कोटीची बिले अदा करण्यात आली आहेत ती बिलेही संघटनेच्या वतीने सातत्याने आंदोलन केल्यामुळेच मिळाली आहेत वारवार आंदोलने केल्यामुळेच मिळाली आहेत उर्वरित 17 कोटीची ऊस बिले मिळाली नाहीत ती मिळावीत म्हणून 23 डिसेंबर रोजी आंदोलन केले होते त्यावेळी 15 जानेवारी रोजी चे धनादेश दिले होते ते धनादेश वटले नाहीत त्यामुळेच 21 जानेवारी रोजी खा संजयकाका पाटील यांच्या घरावर मोर्चाचे नियोजन केले होते मोर्चा घराकडे जात असताना पोलिसांनी अडवला पोलीसी दहशीचा निषेध करतो ही बिले तातडीने मिळावीत यासाठीच खा संजयकाका पाटील यांच्या काऱ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे जो पर्यंत बिले शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग होत नाहीत तो पर्यंत येथून हलणार नाही
सोमवारी महिलांचा मोर्चा
सोमवारी शेतकरी महिला मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होणार आहेत.मंगळवारी मदत फेरी
ठिय्या आंदोलन किती दिवस चालेल याचा नेम नाही आंदोलनासाठी नसता, जेवण , मंडप सह अन्य खर्च आहे तरी जेवणासाठी तांदूळ, तेल भाजी द्यावी असे आवाहन खराडे यांनी केले आहे त्याच बरोबर आंदोलनासाठी तासगाव शहरातून मदत फेरी मंगळवारी काढण्यात येणार आहे.बुधवारी मुंडण आंदोलन .बुधवारी सर्व शेतकरी आंदोलक मुंडण करण्यात येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!