ताज्या घडामोडी

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

अमळनेर येथील साई इंग्लिशअकॅडमि कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली असून, त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा
तुरा रोवला गेला आहे. शिक्षण
क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन
कार्याची, नेतृत्वाची आणि संघटन कौशल्याची ही दखल मानली जात आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) महाराष्ट्र राज्य ही महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी, प्रतिष्ठित आणि शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. सन 2000 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये कार्य असून, हजारो कोचिंग क्लासेस
संचालक या संघटनेचे सभासद आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध
प्रश्न, कोचिंग क्लासेसचे हित,
शैक्षणिक गुणवत्ता आणि
संघटनात्मक बळकटी यासाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे.या नव्या कार्यकारिणीत सातारा येथील डॉ. पी. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर वाई येथील
डॉ. नितीन कदम यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत भैय्यासाहेब मगर यांची कार्याध्यक्ष म्हणून झालेली निवड ही उत्तर महाराष्ट्रासाठी तसेच अमळनेरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
भैय्यासाहेब मगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि कोचिंग क्लासेस क्षेत्राच्या प्रगतीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा लाभ राज्यभरातील क्लासेस संचालकांना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.भैय्यासाहेब मगर यांच्या या मानाच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक संस्था, शिक्षक, क्लासेस संचालक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा
दिल्या जात आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??