ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल असोसिएशन नवी दिल्लीच्या जळगांव शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे इंजी. गिरीश सोनजी पाटील यांची निवड

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल असोसिएशन नवी दिल्लीच्या जळगांव शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमळनेरचे इंजी. गिरीश सोनजी पाटील यांची निवड. अमळगावचे लोकनियुक्त सरपंच व माजी जि प सदस्य जळगाव इंजी. गिरीश सोनजी पाटील यांची दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना या संस्थेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून त्यासंदर्भातले पत्र ह्यूमन राइट्स चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. विलास कांबळे यांच्या स्वाक्षरीने पत्र प्राप्त झाले आहे इंजि. गिरीश पाटील यांची नियुक्ती दोन वर्षाकरिता असून त्यांच्याकडे जळगाव शहर आणि ग्रामीण संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे गिरीश पाटलांचा अनुभव आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर आणि कार्याच्या जोरावर सदर नियुक्ती करण्यात आली आहे गिरीश पाटील हे शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर असून ते भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या सल्लागारपदी देखील त्यांनी कामकाज पाहिलेले आहे त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव शहर आणि जिल्ह्यातील असंख्य गरजूंना मदत होणार असून गरजूंनी आपल्याशी संपर्क साधावा अशा स्वरूपाचे आवाहन जिल्हाध्यक्ष गिरीश पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे तसेच ह्युमन राइट्स इंटरनॅशनल असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील ज्यांना कार्य करण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे गिरीश पाटलांच्या जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, खास करून महाराष्ट्रातील व देशभरातील संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले आहे संघटनेचे कार्य भारतासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सुरू असून गिरीश पाटील यांना त्या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे.श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेले आहेत तालुकास्तरावर लवकरच कमिट्या स्थापन करण्यात येतील असेही श्री गिरीश पाटील यांनी मत व्यक्त केले



