पुज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची मासिक सभा उत्साहात संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
पुज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची मासिक सभा उत्साहात संपन्न मा. आर बी पाटील सर होते प्रमुख वक्ते* पु साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचि मासिक सभा आज रामबाग कॉलनीतील संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सुरुवातीला सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून कै. लिलावती गोविंद चित्ते, कै ऍड प्रवीण भट, कै ताई गळवाडेकर सर याच्या बघिणी , कै गिरीश कुबेर गुरव दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रमुख पाहुणे श्री आर बी पाटील यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील तसेच सचिव एस एम पाटील व सर्व कार्यकारणीच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे आबासाहेब आर बी पाटील सर यांचे स्वागत सत्कार शिवाजीराव पाटील यांनी केले. ज्या 19 ज्येष्ठ नागरिकांचे या महिन्यात वाढदिवस होते त्याना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान श्री आबासाहेब आर बी पाटील प्रमुख पाहुणे व कार्यकारणी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात श्री आर बी पाटील यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना सामाजिक क्षेत्रात ज्या अडचणी येतात त्याच्यावर लक्ष केंद्रित करून कधी बासरी वाजता, कधी हास्याचे फवारे उधळत जेष्ठाचे मनं जिंकून घेतली. डफावर थाप मारत गिते गाऊन प्रेमाचा रंग भरत मनोरंजीत कार्यक्रम कुठे वेळ गेली हे समजलंच नाही ज्येष्ठ नागरिक संघाचं उत्कृष्ट कार्य असल्याबाबत समाधान व्यक्त केलं त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी संघाचे कार्य विशद केलं विरंगळा केंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या इतर योजनेबाबतही खुलासा केला. कार्यक्रमाला नाश्ता देणारे श्री गंभीर अर्जुन चौधरी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव एस एम पाटील यांनी केले प्रार्थना श्री श्रावण पाटील यांनी गायिली, फोटोग्राफी गंभीर चौधरी यांनी केली कार्यक्रमासाठी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष उमाकांत नाईक, सचिव– शिवाजीराव मोहन पाटील, सहसचिव श्रावण पाटील, कोषध्यक्ष श्री देविदास बिरारी, देविदास रामदास जगताप, सुधाकर पवार,गोविंद चित्ते ,गंभीर चौधरी यांनी परिश्रम घेतले उपस्थित सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक,राष्ट्रपती पदक प्राप्त श्री गंभीर अर्जुन चौधरी यांच्यातर्फे नास्ता देण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांचे मनजिंकणारे माननीय आर बी पाटील सर यांचे व उपस्थितांचे आभार सचिव एस एम पाटील यांनी मानलेत व अध्यक्षांच्या परवानगीने सभेची सांगता झाली



