ताज्या घडामोडी

श्री शिवछत्रपती विद्यालयात जलव्यवस्थापन प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येथील श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा व सामाजिक वनीकरण परिक्षेत्र शिराळा यांच्यामार्फत जलशुद्धीकरण व जल व्यवस्थापन या विषयावर विविध प्रयोगांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते .भविष्यकाळात जर नागरिकांनी पाण्याचे जतन व पाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून पाणी जमिनीत मुरवले तर येणाऱ्या काळात पाण्याचे संकट दूर होईल व प्रत्येकाला पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होईल असे प्रतिपादन शिराळा क्षेत्राचे वनपाल श्री संतोष जाधवर यांनी याप्रसंगी केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प पू . स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्था शिराळाचे सचिव माननीय विश्वप्रतापसिंग नाईक ( दादा ) होते .
प्रमुख पाहुणे जाधवर पुढे म्हणाले कि समाजामध्ये जलव्यवस्थान व पाण्याचा योग्य वापर यायाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे .त्यासाठी शाळा” व शाळेतील विद्यार्थी हे समाज परिवर्तन घडवण्याचं माध्यम आहे . म्हणून मुलांना त्यांनी भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाई व व त्यावरील उपाय योजना ची माहिती दिली . यानिमित्त विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोगाच्या प्रतिकृती सादर करून जल व्यवस्थापना वरील विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते यामध्ये विद्यालयातील 125 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन प्रयोगाचे प्रदर्शन आयोजित केले होते .याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम .पाटील , पर्यवेक्षक एस . वाय . यादव , सौ , ए . एस . पाटील , डि . जी . सवाईराम सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस . एस नलवडे यांनी केले व आभार विज्ञान शिक्षक बी .आर पाटील यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!