ताज्या घडामोडी

रिळे, बेलेवाडी,पावलेवाडी,अस्वलेवाडी या गावातील भैरवनाथ सह.पाणीपुरवठा संस्थेची आढावा बैठक संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

रिळे, बेलेवाडी, पावलेवाडी, अस्वलेवाडी (ता. शिराळा) या गावातील शेतीसाठी विश्वासराव नाईक कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेची आढावा बैठक आज संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक विराज नाईक होते. संचालक बिरुदेव आमरे प्रमुख उपस्थित होते. पाण्याचे नियोजन करणे, योजनेखाली ऊस क्षेत्राची वाढ करणे, पाझर पाण्यावरील जास्तीत जास्त ऊस ‘विश्वास’ कारखान्याकडे गाळपास आणण्यासाठी प्रयत्न करणे, संस्थेच्या व सभासदांच्या अडचणीबाबत संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. संस्थेचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष बाळू पावले व सर्व संचालक, रिळेचे सरपंच बाजीराव सपकाळ, पावलेवाडीचे सरपंच मधुकर नांगरे, शेती अधिकारी ए. ए. पाटील, सिंचन अभियंता दिनकर महिंद, ऊस विकास अधिकारी संदीप पाटील व पाणी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!