ताज्या घडामोडी

सैतवड्याच्या शैक्षणिक व सामाजिक संस्थेने युवकांना दिली करिअर संजिवनी

Spread the love

रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावातील शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडे संस्थेच्या वतीने बुधवार दि.27/03/2024रोजी दहावी , बारावी नंतर पुढे काय? याचा वेध घेण्यासाठी करिअर गाईडन्स कार्यक्रमाचे न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे प्रशालेत आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अंगद मुठाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्पांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे तज्ज्ञ मार्गदर्शक मा. अरफाना सय्यद मॅडम यांना संस्थेच्या वतीने सौ.नसिम शेकासन मॅडम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन व सौ. गुरव मॅडम यांना बुके देऊन गौरविण्यात आले.तसेच महाराष्ट्र फाऊंडेशन व गाईड जेएस् डब्ल्यू फेलोशिप  दत्ता गुरव सर यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सज्जाद अ.करिम सय्यद यांनी शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मानित केले.यावेळी विचार मंचावर संस्था सदस्य जावेद काझी,समिउद्दीन माद्रे, मुजफ्फर सय्यद,पडवे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुर्यवंशी सर व न्यू इरा इंग्लिश मेडियमच्या मॅडम उपस्थित होत्या.मुख्याध्यापक श्री.मुठाळ सर यांनी प्रास्ताविकतून करिअर गाईडन्सचे महत्त्व कथन केले.संस्थेचे अध्यक्ष  सज्जाद अ. करिम सय्यद यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून युवकांना कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
तज्ज्ञ मार्गदर्शक  अरफाना सय्यद मॅडम यांनी उपस्थित युवकांना करिअर गाईडन्स अर्थात करिअर विषयक समुपदेशन करताना कौशल्य पूर्वकपणे वेगवेगळ्याअॅक्टीव्हीटींच्या द्वारे त्यांच्या सध्याच्या ध्येयांचा शोध घेतला.व करिअर च्या नवनवीन वाटांचाही उलगडा केला. विविध शिष्यवृत्तींचीही माहिती दिली. युवकांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसनही केले.
संस्थेचे सन्मा. अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी महाराष्ट्र फाऊंडेशन दोन वर्षे सैतवडे परिसरात शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी कशा पद्धतीने कामकाज करणार आहे, याची महाराष्ट्र फाऊंडेशनचे  दत्ता गुरव सर व  अरफाना मॅडम यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख.श्रीम.सिद्धी लांजेकर यांनी तर आभार श्री.नितीन जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या संपूर्ण स्टाफ ने विशेष मेहनत घेतली.न्यू इंग्लिश स्कूल,पडवे,न्यू इरा इंग्लिश मेडियम स्कूल,सैतवडे,दि मॉडेल इंग्लिश स्कूल,सैतवडे व न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे च्या विद्यार्थ्यांनी सदर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!