आरोग्य व शिक्षण
जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी मार्फत ग्रामीण रुग्णालय कोकरूड येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर.
शिराळा प्रतिनिधी – जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांचे मार्फ़त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय कोकरूड येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.सर्वं रुग्णांची मोफत दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून दृष्टी देण्याचे काम हिरकणी ग्रुप च्या सहाय्याने करण्यात आले.नंदादीप हॉस्पिटल सांगली यांचे कॅम्प साठी सौजन्य मिळाले. सदर शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तर 32 रुग्णांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचा सर्वं कर्मचारी वर्ग व हिरकणी च्या सर्वं पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिबीर संपन्न झाले.