आरोग्य व शिक्षण

शिक्षण विषयक शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष

Spread the love

12 वी उत्तरपत्रिका मूल्यांकनावर शिक्षकांचा बहिष्कार

सांगली दि. २०ः(दिलीप जाधव ) राज्यातील शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाल प्रलंबित ठेवून त्यावर कोणताही निर्णय न घेणे व प्रलंबित ठेवणे, वारंवार शासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणे यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 5 सप्टेंबर शिक्षक दिनापासून वेगवेगळ्या टप्प्यावर तालुका व जिल्हा स्तरावर विविध आंदोलने केली तसेच दि.22 डिसेंबरला नागपुर विधिमंडळावर संघटनेने केलेल्या आंदोलनादरम्यान सभा देण्याचे मान्य करुन सुद्धा ती घेतली नाही. मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक केल्यामुळे नाईलाजास्तव वर्ग 12 वी परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यमापनावर महासंघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य अध्यक्ष प्रा डॉ संजय शिंदे व सचिव प्रा संतोष फासगे यांनी म्हटले आहे. आंदोलनाच्या मागण्या—
1)1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
2) 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
3) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी.
4) वाढीव पदांना रुजू दिनांकापासून मंजुरी द्यावी व आय.टी. विषय अनुदानित करावा.
5)अघोषित उच्च माध्य. ला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व क.म.विद्यालयाला प्रचलित अनुदानसुत्र तातडीने लागू करावे. अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात.
6) विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदलीला दि. १ डिसेंबर 2022पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करावी.
7) शिक्षकांची रिक्त पदे त्वरीत भरावीत .
8) कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्यचे निकष शाळा संहितेनुसार असावेत.
9) एम.फिल.,एम.एड.,पीएच.डी. धारक क मी वि शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी.
10) निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे.
11) DCPS/NPS योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी.
12) कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.
13) अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावा.
आंदोलनात सर्व कमवि शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा सुरेश भिसे सचिव प्रा दिलीप जाधव कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील उपाध्यक्ष प्रा. धनपाल यादव, प्रा. पी व्ही जाधव पदाधिकारी, तालुका अध्यक्ष / सचिव तथा पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!