ताज्या घडामोडी

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या हिरक महोत्सवी संदीप घोरपडे सन्मानित

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

काल दिनांक 20 जानेवारी 2023 जळगाव जिल्हा पत्रकार संघ आयोजित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने व जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीला पत्रकार संघाने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ता म्हणून संदीप घोरपडे अमळनेर यांना बाळशास्त्री जांभेकर यांच्या नजरेतून आजची पत्रकारिता व लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता दशा व दिशा या विषयावर व्याख्यानासाठी आमंत्रित केले व तेथे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले तो क्षण व त्या क्षणी व्यक्त केलेले पत्रकारितेविषयीचे विचार उपस्थितांना भावले एवढेच नव्हे तर त्यानंतर श्रोत्यांनी संदीप घोरपडे यांच्या वक्तव्याचे भरभरून कौतुक केले या कौतुकाच्या वर्षावात कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमानंतर ज्येष्ठ पत्रकार विजय बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थितांनी विजय बापू यांचे अभिष्टचिंतन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली मानवी हक्क व संरक्षण समितीचे अध्यक्ष रविंद्र मोरे व प्रसिद्धी प्रमुख एस एम पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!