ताज्या घडामोडी

महाशिवरात्रीला अमळनेर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर-प्रमुख विद्या दिदींचा, पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने, एस एम पाटील यांनी केला सन्मान.

Spread the love

ईगल न्यूज अंमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील महाशिवरात्रीनिमित्त शिव पुजन महिमा साजरा अमळनेर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरला महाशिवरात्रीनिमित्त शिवबाबा चे पूजन करण्यात आले त्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्या ठिकाणी पुज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने मंडळाचे सचिव श्री शिवाजीराव मोहन पाटील,श्रावण पाटील यांनी अमळनेर सेंटरच्या प्रमुख दीदी–विद्या दीदी यांचा शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला पुज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने हा सन्मान विद्या दीदींना देण्यात आला. विद्या दिदिंचे अमळनेर तालुक्यात आणि परिसरात अलौकिक कार्य आहे रोज सकाळी लवकर उठून सर्व भक्तांना मुरली सांगितली जाते ,परमात्मा ज्योती बिंदू स्वरूप असून प्रजापिता
ब्रह्मा बाबा यांची महाशिवरात्री जयंती रूपाने साजरी केली त्यांनी शिव बाबांच्या माध्यमातून अनेक परिवार जोडून, माउंट आबूला पाठवून त्यांच्या संसारात शांती निर्माण केलेली आहे. अशा दीदींचा पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या शुभ प्रभात सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी अमळनेर नगरीचे आमदार अनिल पाटील तसेच माजी आमदार स्मिता ताई पाटील तसेच तिलोत्तमा पाटील ऍड तिलोत्तमा ताई पाटील त्याचबरोबर एडवोकेट ललिता ताई पाटील यादेखील या ठिकाणी हजर होत्या अनेक शिवभक्त शिवबाबा प्रेमी यांनी कार्यक्रमास हजेरी लावली ओम शांती केंद्रास शिवबाबा चे ध्वजारोहण करण्यात आले आणि त्या ठिकाणी विद्या दीदी यांनी शिवबाबा विषयी अध्यात्मिक ज्ञानदिले आणि सर्व भक्तांना प्रसाद म्हणून तोली वाटप झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!