उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.प्रकाश माळी सर यांना साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र प्रदान

जप जीवाला बहुउद्देशीय संस्था (निती आयोग ISO) व आधार पुरुष बचत गट ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या ज्ञानराज सभागृहात शासकीय वाढदिवसाच्या निमित्ताने *जिल्हास्तरीय कवी संमेलन २०२६* आयोजित करण्यात आले होते.यावेळी कविता सादरीकरण तसेच साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी,जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्यवाह,मुंबई माळी समाज मंडळाचे मा.अध्यक्ष व विद्यमान सल्लागार, जायंटस वेल्फेअर फौंडेशन वन सीचे उपाध्यक्ष आणि ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त *प्रा.प्रकाश माळी सर* यांना *स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र* संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी,साहित्यिक,प्रकाशक व उपसंपादक डॉ.एन.ए.कदम,प्रमुख पाहुणे हनुमान व्यवस्थापक मंडळ उल्हासनगरचे अध्यक्ष डॉ.अनिल पावसे आणि कवी संमेलनाचे आयोजक राष्ट्रीय समाजभूषण व समाजसेवक किसनजी बोन्द्रे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.याप्रसंगी खर्डीकर क्लासेसचे संकेत खर्डीकर,सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी पी.एन.पाटील,उद्योजक अनंत विशे,सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर बळीराम कदम,ज्ञानेश्वर सेवा मंडळाचे सदस्य रविंद्र कारेकर,सुरेश बांगर,प्रकाश कंठे आदि मान्यवर उपस्थित होते.या बहारदार कवी संमेलनाचे दिलखुलास सूत्रसंचालन अनिल काकुळते यांनी केले तर ऋणनिर्देश पी.एन.पाटील यांनी व्यक्त केले.या कवी संमेलनासाठी ठाणे जिल्ह्यातील नामवंत कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



