शिक्षक ते साहित्यिक-चित्रपट,पर्यावरण क्षेत्रात,सामाजिक कार्यकर्ता :विलास वानखडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

ई गल न्युज अंमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
शैक्षणीक ,सामाजिक,साहित्यिक,सांस्कृतिक,
पत्रकारिता, चित्रपट व पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत विलास वानखडे सर वयाची पासष्टी पूर्ण करीत असून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!.
विलास वानखडे सरांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा धावता आढावा.वर्धा: विलास भीमरावजी वानखडे,मूळचे अमरावती जिल्ह्यातील वरूड येथीलरहिवाशी.परंतुशिक्षकाच्या नोकरीनिमित ते कारंजा घाडगे, जि. वर्धा येथे सहकुटुंबस्थायिक झाले.वानखडे सर एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शिक्षण, समाजसेवा, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात आपल्या योगदानाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ३० मे १९६१ रोजी जन्मलेल्या वानखडे यांनी एम.एस्सी (गणित) आणि बी.एड. चे शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक कारकीर्द सुरू केली.
*शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य:*
१९८६ ते २०१२ या काळात मॉडेल हायस्कूल, कारंजा घाडगे येथे शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. त्यानंतर मॉडेल हायस्कूल, सालोड (२०१३-२०१५) आणि मॉडेल हायस्कूल, तळेगाव (२०१५-२०१९) येथे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. ३१ मे २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा,एनएमएमएस आणि महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले.
*साहित्यिक आणि सांस्कृतिक योगदान:*
वानखडे केवळ शिक्षकच नव्हते, तर एक संवेदनशील साहित्यिक आणि कलाप्रेमी सुद्धा आहेत. ‘काव्यमय पाढ्यातून मुल्यशिक्षण’ हा त्यांचा काव्यसंग्रह सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर पुरस्काराने सन्मानित आहे. वाचन, लेखन, आणि कविता लेखन व पर्यटन हे त्यांचे छंद आहेत.त्यांनी भारत, दुबई आणि इंडोनेशिया येथे झालेल्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनातही सहभाग घेतला आहे. यासोबतच, संजय सिंगलवार दिग्दर्शित ‘निल’ आणि पियुष भोंडे दिग्दर्शित ‘यशवंत’ या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी सहकलाकार म्हणून शिक्षकाची भूमिका केली आहे.
कारंजा कला क्रीडा अकादमी कारंजा घाडगे अध्यक्ष असून कारंजा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
*सामाजिक कार्याचा वसा:*
समाजसेवेची त्यांची तळमळ त्यांच्या कार्यांतून दिसून येते. मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे आणि आई-वडील नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक साहित्य देऊन मदत करतात. त्यांनी ‘वृक्षमित्र परिवार’ या संस्थेची स्थापना केली असून,
कारंजा शहर हरित शहर करणे हा संकल्प वृक्षमित्र परिवार कारंजा घाडगे या माध्यमातून सुरू आहे.निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र चे ते राज्य सल्लागार आहेत.
ते सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्र लोककला संघ आणि शब्द साहित्य मंडळ वर्धा यांसारख्या अनेक संस्थांशी जोडलेले आहेत.
रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठान नागपूरचे सदस्य आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड सदस्य,
विदर्भ सहयोग मंडळ निगडी पुणे सदस्य असून पिरॅमिड अटलांटे सोसायटी ताथवडे ज्येष्ठ नागरिक संघ माजी अध्यक्ष आहेत.कारंजातून मुलाकडे पुणे येथे जाऊन त्यांनी पुणे येथे सुद्धा आपली स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कारंजा ते शेगाव 10 दिवस पायदळ वारी सुद्धा त्यांनी केली आहे.
*वैयक्तिक जीवन:*
त्यांच्या पत्नी सौ.जयश्री वानखडे या गृहिणी असून,त्यांना दोन मुले आहेत.मोठा मुलगा विजेंद्र व मोठी स्नुषा सौ.विशाखा दोघेही बी.ई. संगणक अभियंता असून पुणे येथे नोकरी करतात, तर लहान मुलगा शुभम डी.फार्म असून कारंजा घाडगे येथे ‘साईराम मेडिकल’ आणि ‘साईराम ॲक्वा’चे व्यवसाय सांभाळतो.लहान स्नुषा सौ.चैताली एम फार्म असून प्राध्यापक आहे.
विलास वानखडे यांचे जीवन हे शिक्षण, साहित्य,कला आणि समाजसेवा यांचा संगम आहे. त्यांच्या कार्यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सौ लता आहेर उपाध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील सचिव प्रकाश चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा अभिनंदन केलेलं आहे
~*अक्षय मेहरे भारतीय*
*+919766077209*



