ताज्या घडामोडी

भिवंडी मनपाचे महापौर नारायण चौधरी यांच्या शुभहस्ते वरिष्ठ पत्रकार डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !

भिवंडी :(स्व.रा.तो) मिडिया हब पत्रकार परिषद, भिवंडी यांच्या
तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा भिवंडीतील वरिष्ठ पत्रकार डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भिवंडी महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर श्री.नारायण चौधरी यांच्या शुभहस्ते शाल,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पत्रकारितेतील निष्ठा, सामाजिक बांधिलकी, जनसेवेची भावना तसेच पत्रकार परिषदेस दिलेले सहकार्य आणि योगदान याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.किशोर बळीराम पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पत्रकारिता हीच जनसेवा असून समाजहितासाठी कार्यरत राहा, कारण पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तुमच्या मुळेच आम्हा सर्वांना अनेक गोष्टींची माहिती होते. तसेच आज मला या ठिकाणी बोलावून माझा सन्मान केला व पत्रकारांचा सन्मान करण्याचा भाग्य मला मिळाला.या पत्रकारिता सन्मानामुळे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पत्रकारांना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी मार्गदर्शन करताना महापौर नारायण चौधरी यांनी व्यक्त केली.
पत्रकारांनी आयोजित केलेला कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी पत्रकारांना पुढे जाण्याचं व्यासपीठ मिळतं, भिवंडीतील सर्व पत्रकार पत्रकारांची एक वज्रमुठ तयार झाली तर कोणीही पत्रकारांना दबाव आणू शकत नाही. जर पत्रकारांनीच पत्रकारांचे पाय ओढण्याचा प्रयत्न केला तर कोणताही पत्रकार पुढे जाऊ शकत नाही म्हणून आपण सर्व एक झालो पाहिजे असे आवाहन भिवंडीतील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. श्री किशोर बळीराम पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार आचार्य सुरज पाल
यादव, युवा अध्यक्ष तेजस मनोज काटेकर, अमर,राष्ट्रीय अध्यक्ष इरशार खान, राष्ट्रीय महासचिव युसुफ मन्सुरी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संदीप गुप्ता तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज मेमन
ॲड. चांदणी मुजावर, छोटी निलम, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पत्रकार वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय अध्यक्ष इरशार खान यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय कार्याध्यक्ष संदीप गुप्ता यांनी केले.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिडिया हब पत्रकार परिषदेच्या सर्व सभासदांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??