ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी निवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.ही सर्व शिक्षण प्रेमी आणि साहित्यिक क्षेत्राबरोबर वैज्ञानिक क्षेत्रातही आनंद पसरला आहे. 2025-26 हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून साजरे होत आहे.सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे उपराजधानी असलेल्या चांदवड (जिल्हा नाशिक) येथे शनिवार दिनांक ११ एप्रिल आणि रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी होत आहे.आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू यांची निवड ही दुग्ध शर्करेचे योग आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चांदवड गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची टांगसाळ होती.दारूगोळा निर्माण करण्याचा कारखाना होता. रंगमहल म्हणून प्रसिद्ध असणारा होळकर वाडा हे या साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे.चांदवड येथे शक्तिपीठ असलेल्या रेणुकादेवींचे मंदिर आहे.आणि हे मंदिर होळकर ट्रस्टच्या मालकीचे आहे.अशा या धार्मिक,ऐतिहासिक गावात आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या नाशिक जिल्ह्यात आदिवासींची संख्या अधिक आहे.डोंगराळ भाग आहे आणि भागात धनगर समाज अधिक आहे.आणि अनुसूचित जमाती यादीत समावेश असलेल्या धनगर समाजाची अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमल बजावणी करावी ही मागणी गेली काही वर्षे चालू असून आंदोलने आमरण उपोषणे देखील होत आहे.आणि यपूर्वीचे आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणावर परिसंवाद देखील झाले आहेत.ठराव झाले आहेत.सद्यस्थितीत धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमल बजावणी करावी म्हणून आंदोलने चालूच आहेत या पार्श्वभूमीवर सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड येथे होत आहे.या सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.सहाव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश महानवर हे सातारा जिल्ह्यातील माण या दुष्काळी तालुक्यातील देवडी या गावात वास्तव्यास असलेल्या गरीब कुटुंबात जन्म घेतला.जन्म कोणत्या कुटुंबात घ्यावा कोणत्या जातीत घ्यावा हे आपल्या हाती नाही पण कर्तृत्व सिद्ध करणे हे आपल्या हाती असते हे डॉ. महानवर यांनी आपणा सर्वांना दाखवून दिले आहे. डॉ.प्रकाश महानवर यांचे आई आणि वडील अशिक्षित होते पण मुलांना शिक्षणात खंड पडू दिला नाही. डॉ.प्रकाश महानवर यांचे मानगड येथे मेंढरे राखत शालेय शिक्षण झाले.महाविद्यालयीन शिक्षण दहिवडी येथील महाविद्यालयात झाले.पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठात पूर्ण केले आणि अध्यापनाचे काम देखील मुंबई विद्यापीठात सुरू केले.रसायन तंत्रज्ञान संस्थे तील पॉलिमर आणि सरफेस इंजिनियरिंग विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहिले.रानावनात मेंढ्या राखणारा शालेय विद्यार्थी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेने मुंबई विद्यापीठात प्राध्यापक आणि आज कुलगुरू आहेत. मेंढपाळ ते कुलगुरू असा दैदिप्यमान प्रवास प्रेरणा देणारा आहे.आणि हीच प्रेरणा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावी हाही उद्देश संमेलातून व्हावा . अध्यापनाचे संशोधनाचे कार्य करत असताना अनेक औद्योगिक कंपन्यांचे सल्लागार म्हणून कार्यरत होते.या काळात पाच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पेटंट मिळाले आहेत एकूण 112 संशोधन शोध निबंध लिहिले आहेत.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे.32 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.21संशोधक विद्यार्थ्यांनी डॉ.प्रकाश महानवर यांचे मार्गदर्शनाखाली Ph.D संशोधनात्मक पदवी प्राप्त करून घेतली.9 संशोधक विद्यार्थ्यां संशोधन करत आहेत.महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स , कलर सोसायटी आणि इंडियन केमिकल सोसायटी यांनी फेलो बहाल केले आहे.अनेक संस्थांनी पुरस्कार मिळालेले आहेत. दूरशिक्षण आणि मुक्त शिक्षण संचालक,मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता अशा विविध पदावर मुंबई विद्यापीठात कार्य करत राहिले आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुशासन प्रशासन आणि पारदर्शी या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा कारभार हाती आला तेव्हा त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी होती.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत पूर्ण करणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पन्नास फुटी भव्य पुतळा उभारला जात होता त्याचे काम वेळेत पूर्ण करणे आणि पुतळ्याच्या परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभे करणे. बारव उभे करणे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान उभारणे ही कामे द्रुत गतीने करून घेणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे लोकार्पण करणे ही अती तातडीची कामे करून घेत विद्यापीठ लोकाभिमुख करण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.वन विभागातून जागा ताब्यात घेणे यासारखी किचकट कामे पार पाडली आहेत.असे बहुढंगी बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ.प्रकाश अण्णा महानवर हे सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लाभलेले आहेत.प्रा.देवेंद्र मदने सोलापूर.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??