क्रीडा व मनोरंजन

ओमसाई स्पोर्ट्स शिराळा,वतीने १८ ते २३ फेब्रुवारी डे नाईट फुलपीच स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – ओमसाई स्पोर्टस् शिराळाच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेली 15 वर्षे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहोत. सध्या टेनिस क्रिकेट हा खेळ मोठ्या प्रमाणात व्यावसायिक खेळ झाला असून याच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपले कुटुंब चालवत आहेत. अशाच प्रकारची संधी आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना निर्माण करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याकरिता दिनांक 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2023 पर्यंत डे-नाईट फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे सदरच्या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक 51 हजार व चषक द्वितीय क्रमांक 31 हजार व चषक तृतीय व चतुर्थ क्रमांक 11 हजार व चषक त्याचबरोबर शिराळा शहरासाठी स्वतंत्र शिराळा प्रीमियर लीग (SPL) घेण्यात येणार आहे या स्पर्धेचे प्रथम क्रमांक 11000 व चषक द्वितीय क्रमांक 7000 व चषक असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलं संपूर्ण देशभर आपल्या खेळाचे प्रदर्शन करून नाव मिळवतील व मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी त्यांना मिळेल हाच उद्देश ठेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!