ताज्या घडामोडी

मोटार सायकली चोरट्यांना पोलीसांनी शिताफीने केले जेरबंद

Spread the love

पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने दि. २५/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोशि / अभिजीत ठाणेकर व पोशि / रोहन घस्ते यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, बहादुरवाडी ते कोरेगाव जाणारे रोडलगत असले मोबाईल टॉवर जवळ राहणाऱ्या इसमाकडे चोरी केलेल्या मोटार सायकली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, बहादुरवाडी ते कोरेगाव जाणारे रोडवर असले मोबाईल टॉवरजवळील पत्र्याचे शेडमध्ये राहणारे संशयीत बालअपचारी याचे राहते घराजवळ जावून पंच व त्याचे नातेवाईकासमक्ष मिळाले बातमीप्रमाणे त्याचेकडे विचारणा केली असता, त्याने प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास त्याचे नातेवाईकांचे समक्ष विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सांगितले की, गणपती मंदीर सांगली, घाट रोड मिरज आणि चिचणी वांगी येथून ३ शाईन मोटार सायकली आणि आष्टा येथून बजाज कावासाकी मोटार सायकल चोरल्या असल्याची कबूली दिली.त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सांगली, मिरज, चिचंणी वांगी आणि आष्टा पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेखावरील मोटार सायकल चोरीचे दाखल असलेल्या गुन्हयाबाबत माहिती घेतली असता, सदरच्या मोटार सायकली चोरीस गेल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या मोटर सायकली पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केल्या.सदर जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत. सतिश शिंदे,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!