क्रीडा व मनोरंजन

बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम स्पर्धा विकास महाडिक, कोमल कदम विजेते  

Spread the love

बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये विकास महाडिकने पुरुष एकेरीचे तर कोमल कदमने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले.  अंतिम सामन्याच्या मध्याला १०-८ अशी आघाडी घेणाऱ्या हेमंत शेलारला विकास महाडिकने २०-१० असे चकविले. परिणामी हेमंत शेलारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या अंतिम सामन्यात कोमल कदमने प्रत्येक बोर्डात निर्णायक क्षणी उत्तम खेळ करीत मयुरी कालवला ७-० असे पराभूत करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. असिस्टंट जनरल मॅनेजर-एचआर श्रीमती लिपिका पढी व असिस्टंट जनरल मॅनेजर-सीआरएम श्री. दिपेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम स्पर्धेमधील उपांत्य फेरीच्या पुरुष एकेरी सामन्यात विकास महाडिकने जितेंद्र मिठबावकरचा १४-४ असा तर हेमंत शेलारने अरविंद दपकेचा १०-४ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात जितेंद्र मिठबावकरने अरविंद दपकेचे आव्हान १२-० असे सहज संपुष्टात आणले. महिलांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात समीक्षा शेगुलवडकरने सोनल रिशीवर ६-२ असा विजय नोंदविला. पहिल्या चार क्रमांकाचे विजेते बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला कॅरम संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ही स्पर्धा बेलार्ड पियर येथे एकूण ५६ स्पर्धकांच्या सहभागाने उत्साहात पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!