ताज्या घडामोडी

बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा मा. हितेंद्र ठाकूर – यांच्या उपस्थितीत संपन्न

Spread the love

मंजूर कामांचे मान्यवरांच्या हस्ते भुमिपुजन.

४ मार्च सफाळे ( वैभव पाटील )

दिनांक ३ मार्च २०२४ रोजी बोईसर मतदार संघातील खालील कामे, १) ५४५५ अंतर्गत मंजूर कामे, २) २५१५ योजने अंतर्गत मंजूर कामे, ३) दलितवस्ती योजने अंतर्गत मंजूर कामे, ४) ३०५४ – ५७२२ अंतर्गत मंजूर कामे, ५) पर्याटन विकास निधी अंतर्गत, ६) आमदार निधी अंतर्गत मंजूर कामे, ७) प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होणाऱ्या विकास कामाचे भुमिपुजन मौजे बहाडोली, टेंभी खोडावे, जलसार, विराथन बुद्रुक, मांडे, दातिवरे, डोंगरे, भादवे, चटाळे, नगावे, सफाळे, विराथन खुर्द, वेढी, आंबोड आदी गावे बोईसर मतदार संघात समाविष्ट असलेल्या गावातील आणि विविध विकास निधी अंतर्गत मंजूर असलेल्या कामाचे सकाळच्या सत्रात, राजेश पाटील – आमदार बोईसर विधानसभा यांच्या हस्ते आणि विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून भुमिपुजन करून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी प्रत्येक ठिकाणी भुमिपुजन करतांना, गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
दुपार नंतर नवघर ते घाटीम या महत्वकांक्षी कॉंक्रिट रस्त्याचे भूमिपूजन, बहुजन विकास आघाडीचे लोकनेते मा. हितेंद्र ठाकूर ( आप्पा ) आमदार विरार विधानसभा यांच्या शुभहस्ते सायंकाळी ५.३० करण्यात येऊन, पोमेलो गार्डन रिसॉर्ट , नायरा पेट्रोल पंप जवळ सफाळे पुर्व ता. जि. पालघर येथे बोईसर, पालघर तसेच डहाणू तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ( आजी / माजी ) कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात एकत्रित आल्याचे दिसून आले. बहुजन विकास आघाडी पक्ष हा जिल्ह्यात एक नंबरवर पक्ष असून आता पालघर डहाणू मतदारसंघात देखिल बहुजन विकास आघाडीचाच आमदार आणि पालघर जिल्ह्याचा खासदार देखिल आपल्याच पक्षाचा ( ब. वा. आ. ) असावा असा आग्रह लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या कडे पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ते ते पदाधिकारी यांनी एकमुखाने मागणी करीत सांगितले यावेळी मा. हितेंद्र ठाकूर – लोकनेते यांनी कार्यकर्ते, पक्षाचे आजी- माजी पदाधिकारी यांना सांगितले, आपला पक्ष ८० % टक्के समाजसेवा करण्यात व्यस्त आहे. मी आपल्या समाजातील एक घटक आहे. या समाजाचे मला काही देणे आहे. त्यासाठी मला माझ्या मतदार संघातील गोरगरीब, वंचित घटकांन साठी जे काही देता येईल ते देण्यासाठी प्रयत्नशील पणे प्रयत्न करीत राहणार आहे.
मा. राजेश पाटील – आमदर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, मला माझ्या मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने. मी माझ्या मतदार संघातील गावांचा विकास करून, गाव गावातील कार्यकर्ते माझ्या संपर्कात असल्याने मला विकास कामाची गंगा गावात नेण्यासाठी सहकार्य मिळाले. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा ना न्याय देण्यासाठी, लोकनेते आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ब. वि. आघाडी पक्षाच्या माध्यमातून मी सतत प्रयत्नशील आहे. याप्रसंगी सौ. मनिषाताई निमकर- माजी. राज्यमंत्री तथा, जि. प. पालघर समाज कल्याण सभापती यांनी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना सांगितले, पक्षाने मला पालघर विधानसभा लढविण्यासाठी संधी द्यावी, कारण मी आपल्या कार्यकाळात तळागाळातील लोकांसाठी अनेक लोकोपयोगी कार्य केले आहे. आणि पुढेही करीत राहिले. श्रीम. भावना विचारे- पालघर जि. प सदस्या व ब. वि. आ. जिल्हा अध्यक्षा, विष्णु कडव – माजी जि. प. सदस्य, यांनी आपापल्या परीने मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,तालुका अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नागेश पाटील,माजी बांधकाम सभापती सुरेश तरे, युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र राजपूत, ब. वि.आ.आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष प्रसाद पर्हाड, पी. टी.पाटील सर, तालुका युवा अध्यक्ष कमनिष राऊत. युवती अध्यक्षा धनश्री रेवंडकर, प्रज्ञा ताई तरे, आदी पदाधिकारी व सरपंच ,उपसरपंच शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!