ताज्या घडामोडी

आधुनिक तंत्रज्ञानाने मोसंबी पिक बहरले

Spread the love

नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील उच्चशिक्षित दिनकरराव कदम यांनी आपल्या शेतामध्ये मोसंबीचे पीक घेतले आहे त्या प्रक्षेत्राला कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांनी भेट देऊन नवीन तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली या महिन्यामध्ये फळबागेसाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते तसेच मागील आठवड्यात ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांचा फळावर प्रादुर्भाव होत असतो त्याचप्रमाणे पिकांच्या वयोमानाप्रमाणे त्यांची भूक वाढते त्यासाठी अन्नद्रव्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे फळगळ होऊ नये यासाठी प्लॅनो फिक्स एन ए एक फवारणी करावी विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा त्यामध्ये जिंक सल्फेट व फेरस सल्फेट असलेली सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते वापरावीत पाण्याच्या पाळी मधील अंतर मार्च महिन्यात समान ठेवावे ठिबक ने पाणी दिल्यास झाडाच्या परिघाभोवती जास्त मुळे असतात तेथे पाणी देणे आवश्यक असते बुंद्याजवळ पाणी साठू देऊ नये आणि विशेषता झाडांच्या खोडाला गेरू लावणे फायदेशीर ठरते या सर्व मशागत तंत्रज्ञान व नवीन उच्च तंत्रज्ञान यासंदर्भात दिनकरराव कदम यांना माहिती असल्यामुळे संत्रा झाडांची वाढ व मोसंबी झाडे निरोगी आहेत त्यांची जमीन उत्तम निचऱ्याची मध्यम काळी असून चुनखडीचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पीक बहारदार आले आहे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर ढगे यांनी इंजिनियर दिनकरराव कदम यांच्या कष्टाबद्दल कौतुक केले उन्हाळी हंगामात फळ झाडाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!