राजकीय

पेठ येथे शिराळा व वाळवा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

नानासाहेब महाडीक शैक्षणीक संकुल पेठ नाका ता.वाळवा येथे इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदासंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा व नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सरपंच, उपसरपंच,सदस्य तसेच निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांचा सन्मान -सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुरेशभाऊ खाडे, माजी मंत्री मा.सदाभाऊ खोत, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा.मकरंद देशपांडे, ज्येष्ठ नेते मा.सी.बी पाटील आप्पा, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक मा.राहुल महाडीक दादा,भाजप प्रदेश सदस्य सम्राट महाडिक जेष्ठ नेते मा.स्वरूपराव पाटील, जेष्ठ नेते मा.जयसिंगराव शिंदे सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच यावेळी सांगली- पेठ रस्त्यासाठी भरून निधी दिल्याबद्दल पालकमंत्री मा.सुरेश भाऊ खाडे यांचा जाहीर जंगी नागरी सत्कार करण्यात आला.

प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती जगन्नाथ माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निजाम मुलानी, वाळवा पश्चिम भाजपा अध्यक्ष डॉ.सचिन पाटील, माजी नगरसेवक सतीश महाडीक, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, माजी नगरसेवक अमीत ओसवाल, कुरळूप चे अशोक पाटील तात्या, माजी नगरसेवक अमोल पडळकर, भाजपा सांगली जिल्हा सरचिटणीस सचिन सातपुते सुदाम पाटील, संजय घोरपडे,नेर्ले गावचे माजी सरपंच जयकर कदम, माजी पंचायत समिती सदस्य मारूती खोत, रवींद्र पाटील,सतिश काका पाटील, शिराळाचे माजी नगरसेवक केदार नलवडे, महिला भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ.विद्याताई पाटील, प्रा.प्रदिप पाटील सर, महाडीक युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात, संग्राम गोईंगडे, बबन शिंदे, गोरख पाटील, संदीप पाटोळे, शशीकांत साळुंखे यांच्यासह इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!