राजकीय

पालघर तालुका मनसेच्या अध्यक्षपदी संदीप किणी

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी दि. २६
पालघर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षपदी मनसेचे तरुण- तडफदार कार्यकर्ते संदीप किणी यांची सोमवारी (दि. २६) निवड करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघर तालुक्याची मनसेची धुरा केळवे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप किणी यांच्याकडे सोपविली आहे. संदीप किणी यांनी परिसरात मध्ये अनेक विधायक कामे केली आहेत. विशेषतः गेल्यावर्षी या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असता स्वतः टॅंकरने परिसरातील काही गावपाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. ते परिसरातील गरजूंना शक्य तितकी मदत करत असून आपल्या परिसरात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर पालघर तालुक्याची धुरा सोपविली आहे.

संदीप किणी यांना दिलेल्या निवड पत्रामध्ये आपल्याकडून समाजातील कोणत्याही घटकाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव्य होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडावे असे अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे.

आत्ताच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये तालुका मनसेने विशेष अशा प्रकारची यश प्राप्त केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

पालघर तालुका कार्यकारणी…

-अध्यक्ष- संदीप भगवान किणीप

-उप तालुका अध्यक्ष- हर्षल परशुराम पाटील

-महिला उपतालुका अध्यक्ष- जाई संजय किणी

-केळवे रोड विभाग अध्यक्ष- सचिन रोहिदास किणी

-केळवे शाखा अध्यक्ष- साईनाथ रविंद्र राऊळ

– केळवे शाखा उपाध्यक्ष- महेंद्र रामा मोहनकर

– केळवे उपतालुका अध्यक्ष- राजेश बाबू वांगड

-केळवेरोड शाखा अध्यक्ष- जयकांत दत्तात्रय घरत

-केळवेरोड पूर्व शाखा अध्यक्ष- अक्षय किशोर राऊत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!