क्राईम न्युज

कांदिवली पश्चिम मध्यें तीन पत्ता दाखवून हात चलाखीने फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ.

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली.
मुंबई मधील कांदिवली पश्चिम येथील एम.जी.रोड,हिंदुस्थान नाका,महाराष्ट्र नगर,सह्याद्री नगर,आदि ठिकाणीं गेल्या अनेक दिवसापासुन तीन पत्ता दाखवून हात चलाखीने फसवणूक करणाऱ्या टोळी धुमाकूळ घातलेला दिसून येतो.कांदिवली पश्चिमेला काही विभागात भर रस्त्याच्या बाजुला गर्दीच्या ठिकाणी छोट्या बैग वर किंवा रुमालावर पत्त्या मधील राजा,राणी,गुलाम असे तीनरंगीत पत्ते पालथे ठेवून त्यातील राजा असलेल्या पत्यावर जेवढे पैसे ठेवले जातील व राजाचा पता ओ ळखतील त्यास ठेवलेल्या पैश्याच्या दुप्पट पैसे दिले जातात.तीन पत्ते दाखवून हात चलाखीने फसवणूक करुन समोरच्या व्यक्तीला फसविले जाते.१०रु.चे २० रु.२० र.चे ४०रु.५०चे १००,१०० रु.चे२०० ५००रु. चे १०००रु,२०००रु.४००० रु.अशा मोठ्या प्रमाणात राजाचा पत्ता असेल या आशेवर नजर लाऊन,नागरिक पैसे पत्त्यावर ठेवतात,पण हात चलाखीने फसवणूक करुन पैसे गुलाम व राणीच्या पत्त्यावर लावलेले आढळतात.या वेळी टोळीतील काही जण उभ्या राहिलेल्या नागरिकानापैसे लावण्यासाठी प्रोत्साहन देतात.स्व:ता ही पैसे ठेवतात,व जिंकतातही.उभे असलेले नागरिक फसतात व आपल्या जवळचे ठेवलेले पैसे काढून पत्त्यावर ठेवतात व अक्षरशः फसविले जातात.पत्तेवाल्याच्या हात चलाखीने पैसे हारतात.त्या टोळीतील काही जण तिथे पाळत ठेऊन पोलीस येतात का? किंवा आपल्या धंद्यात काही समस्याअडचण तर निर्माण होत नाही ना हे पाहत फिरतात.नोकरदार, रिक्षावाले,शाळा काॅलेज ची मुले ही या फसवणूकीला बळी पडतात.तरी या विभागातील नागरिकांनी सावध राहून अशा हात चलाखी करणाऱ्या पासून सावध राहवे.या टोळीतील लोक खूपच चालाख असतात,पोलीस दिसताच खेळ बंद करुन जणू काही घडलेच नाही असे दाखवतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!