क्राईम न्युज

खंडणीची मागणी करणा-यांची इस्लामपुर पोलीसांनी केली तात्काळ कारवाई

Spread the love

दिनांक २३/१२/२०२२ रोजी फिर्यादी यांचे इस्लामपुर शहरातील शिवनगर येथील जुगाई पान टपरीवर आरोपीत मावा, तंबाखु खाण्यासाठी जात असे परंतु कधीही पैसे देत नसे व पैसे मागीतल्यास पान टपरी फेकुन टाकीण अशी धमकी देत असे तसेच एके दिवशी यातील अनमोल मदने यास फिर्यादीने माव्याने पैसे  मागितलेचे कारणावरुन त्यांचेत वाद झाला होता. तसेच आरोपी नामे गुरुसिध्द जाधव याने दि. २३/१२/२०२२  रोजी फिर्यादीचे जुगाई पान शॉप, शिवनगर, इस्लामपुर येथे येवुन २५,०००/-रु खंडणीची मागणी केली व रोख रक्कम पैसे न दिल्यामुळे इतर आरोपी नामे अनमोल मदने, हर्षल घेवदे, साहिल जमादार यांचे सह पान  टपरीच्या समोर येवुन फिर्यादी यांचे वडीलांची कॉलर पकडली व त्यांना सोडविण्यासाठी फिर्यादीचा भाऊ दुर्गेश हा गेला होता. सदरवेळी अनमोल मदने याने फिर्यादीचा भाऊ दुर्गेश यास तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणुन त्याच्या हातातील तलवारीने भाऊ दुर्गेश पाटोळे याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर गंभीर जखम केली व गुरुसिध्द जाधव याने त्याच्या हातातील चाकुने दुर्गेश हाताच्या दंडावर भोकसुन गंभीर जखम केली. त्यावरुन इस्लामपुर पोलीस ठाणेत भा.द.वि.स. कलम ३०७, ३८५, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला  होता. श्रीमती.पद्मा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री शशिकात चव्हाण, पोलीस निरीक्षक इस्लामपुर पोलीस ठाणे, यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य त्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे इस्लामपुर गुन्हे प्रकटिकरण शाखे कडिल सपोनि.प्रविण साळुंखे, पोहेकॉ  दिपक ठोंबरे, पोना  अरुण पाटील, पोशि आलमगीर लतिफ, पोशि सचिन सुतार यांनी गोपनीय माहिती काढुन सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी इस्लामपुर शहरातुन व आजुबाजुच्या परीसरातुन २४ तासाच्या आता चारही आरोपी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि  प्रविण साळुंखे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!