क्राईम न्युज

इस्लामपुर मध्ये दुचाकी मोटर सायकल चोरटयास अटक

Spread the love

इस्लामपुर मध्ये दुचाकी मोटर सायकल चोरटयास अटक करून त्याचे कडुन 60,000/- रु. की च्या चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त.

इस्लामपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

इस्लामपुर पोलीस ठाणे मध्ये  श्री बसवराज तेली  पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती अंचल दलाल  अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी वाढत्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामुळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरट्याचा शोध घेवुन अटक करण्याचे आदेश दिले होते.

 

त्याप्रमाणे श्री अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी, सांगली शहर चार्ज- इस्लामपुर व श्री. शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक, इस्लामपुर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सपोनि श्री. प्रविण साळुंखे, उत्तम माळी, दिपक ठोंबरे, अरुण पाटील, प्रदिप पाटील, गणेश शेळके, सुरज जगदाळे, उमेश शेटे, अमोल सावंत, आलमगिर लतीफ, योगेश जाधव यांचे पथकाने इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरास पकडण्याचे शोध कार्य सुरु करुन पेट्रोलींग करीत असताना प्रशासकीय इमारतीच्या समोर एक इसम बिगर नंबरची मोटरसायकल घेवुन पेठ रोडने इस्लामपुर कडे येताना दिसला म्हणुन आम्ही त्याला इशारा करून थांबुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रेहान बावाखाना मालदार रा. कापुसखेड रोड नेहरूनगर इस्लामपुर ता. वाळवा असे असल्याचे सांगीतले  त्याचे ताब्यात असलेले मोटर सायकलचे कागदपत्राबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तर देवु लागला. त्यानंतर आम्ही त्याचे ताब्यातील मोटर सायकलचे चेसीस नंबर व इंजिन नंबर वरुन खात्री केली असता सदर गाडी चोरी बाबत इस्लामपुर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल असल्याचे समजले त्यानंतर सदर गाडीचा पंचनामा करून आरोपीस गाडीसह ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन त्याचे तपास केला असता त्याने चोरीच्या 60,000/- रूपैये किमंतीच्या दोन मोटरसायकली त्याचे कडुन जप्त करण्यात आले असुन आरोपी यांस कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळाले आहे.श्री अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी, सांगली शहर चार्ज इस्लामपुर व मा. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण सो, इस्लामपुर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपुर पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेतील सपोनि श्री. प्रविण साळुंखे, उत्तम माळी, दिपक ठोंबरे, अरुण पाटील, प्रदिप पाटील, गणेश शेळके, सुरज जगदाळे, उमेश शेटे, अमोल सावंत, आलमगिर लतीफ, योगेश जाधव यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!