क्राईम न्युज

उजैनच्या नावाखाली समाजात वावर असलेल्या भोंदुबाब ला नाशिक जिल्ह्यातुन ताब्यात

Spread the love

दिनांक ०३/१२/२०२२ रोजी फिर्यादी पांडुरंग शिवराम सावंत यांचे घरी दोन अनोळखी इसमांनी दुप्पट पैशे करुन देतो असे अमिष दाखवुन ५,००,०००/- रु ची फसवणुक केली बाबत इस्लामपुर पोलीस ठाणेस गुरन. ७१२ / २०२२ भादविस ४०६, ४२०,३४, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध अधि. २०१३ चे कलम २, ३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मा. श्रीमती.पद्मा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री शशिकात चव्हाण, पोलीस निरीक्षक इस्लामपुर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्या उघडकिस आणने कामी गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य त्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे इस्लामपुर गुन्हे प्रकटिकरण शाखे कडिल सपोनि.प्रविण साळुंखे, पोहेकॉ / दिपक ठोंबरे, पोना / अरुण पाटील, पोशि/ आलमगीर लतिफ, पोशि/सचिन सुतार यांनी गोपनीय माहिती काढुन बुलढाणा, जळगाव व नाशिक जिल्हा हद्दीतील गेली ३ दिवस पेट्रोलिंग करुन | बातमी काढली असता सदर गुन्ह्यातील उजैनच्या नावखाली समाजात वावर असलेल्या भोंदुबाब ला नाशिक जिल्ह्यातुन ताब्यात घेतल्या नंतर त्याचे साथिदार हे जळगाव व बुलढाणा हद्दित असल्याचे सांगता त्याचे | सथिदारांना ताब्यात घेतले नंतर त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असुन सदर गुन्ह्यात १) १,४५,०००/-रु रोख रक्कम आरोपीत यांच्या ताब्यात मिळाली आहे…

सदर गुन्ह्यातील आरोपीची नावे १ ) शब्बीर गुलाब शेख वय – ४०वर्षे रा. देवुळगाव साकर्शा ता. मेहकर जि. बुलढाणा २) दिनेश बाळु पाटील वय-२७ वर्षे रा. चुंचाळे ता. यावल जि.जळगाव ३) विलास काळु सुपारे वय- ४२वर्षे रा. दाभाडे ता. मालेगाव जि.नाशिक असे ताब्यात घेतलेले आरोपींची नावे आहेत. सदर आरोपीस मा. न्यायदंडाधिकारी सो, इस्लामपुर यांचे समोर हजर केले असता त्यास ०४ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपीत यांचे कडुन आणखी काही गुन्हे उघडकिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि / प्रविण साळुंखे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!