महाराष्ट्र

ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित मम्मा प्रि स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा…

Spread the love

नेर्ले ( वाळवा ) येथे ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित मम्मा प्रि स्कूलमध्ये  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा……. सदरचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम अगदी उत्साहात करण्यात आला, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पत्रकार संतोष खरमाटे, अभिनेते राहुल मगदूम, शिव शंभू वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष संदीप मोहिते, गणेश वारके, संग्राम पाटील, जयदीप मगदूम, हे उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली व त्यानंतर स्कूलच्या प्रिन्सिपल दर्शु जगताप मॅडम यांनी स्वागत व प्रास्ताविका केली प्रास्ताविकेमध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य हे क्रांतिकारकाच्या बलिदानामुळे मिळालेला आहे व आपला भारत देश कधीही झुकला नाही, या गोष्टींची माहिती मुलांना दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष खरमाटे यांनी स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर राहुल मगदूम म्हणाले, आधुनिक भारताला प्रेरणा देणारे हे विद्यार्थीच असतात आणि हे विद्यार्थी मम्मा प्री स्कूल मध्ये चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, आणि हा कार्यक्रम बहारदार करण्यासाठी स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवा निमित्त भाषण स्पर्धेमध्ये भाग घेऊन खूप चांगल्या पद्धतीने भाषणे त्यांचे कौतुक सर्व प्रमुख पाहुण्यांनी केले. स्कूलचे शिक्षिका प्राजक्ता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून स्पीच म्हणून घेतले विद्यार्थिनी नियंत्रण वर्षाराणी वेटम मॅडम श्रद्धा जाधव मॅडम व स्नेहल पाटील मॅडम यांनी स्टेज सजावट व रांगोळी सजावट केली त्यामुळे कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!