महाराष्ट्र

मोघली मानसिकता

Spread the love

छञपती शिवरायांनी मराठा साम्राज्याला अर्पित केलेले राज्य म्हणजेच स्वराज्य.हे स्वराज्य म्हणजे अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांच्या रक्ताने न्हाहुन निघालेले ‘ स्व ‘ तख्त.या मातीच्या रक्षणासाठी,संवर्धनासाठी कैक जाती मांडीला मांडी लावुन मरणासाठी एकवटल्या.येथल्या हरएक मातीच्या कणांना दगड-धोंड्यांना रक्ताच्या थेंबानी अभीषेक घातला आहे.स्वराज्याची ही धुरा छञपती संभाजी राजांनी शिरसावंद्य माणुन दिवस-राञ एक करुन कमावलेले हृदयाशी जतन केलेच शिवाय ते वृद्धिंगत करण्यासाठी कायम मरण पाठीशी बांधले.एवढा देखणा-दिमाखदार सोहळा या मातीने घडविला.हा सोहळा उभा करण्यासाठी होळकर-शिंद्यांनी मरण पाठीवर बांधुन उत्तरेकडील राज्य वाढविले.दिसेल ती भुमी स्वतःच्या नजरेच्या टप्प्यात आणली.उभा भारतखंड भगवामय केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घाट-मंदिरे बांधलीच शिवाय गनिमांचा थाटही उतरविला.हे स्वराज्य सुराज्य व्हावे ही इर्षा ठेऊन कारभाराची घडी बसविण्यात आली.कैक बारवांची निर्मिती करुन रयतेची तृष्णा भागविली.मल्हाररावांचे साम्राज्य गिळंकृत करण्यास आलेल्या राघोबादादा पेशव्याचा केवळ शब्दानेच पराभव केला.बोचऱ्या शब्दांनी राघोबास घायाळ केले.पती खंडेराव व मालोजी राजांचा मृत्यु पचवुन त्याच त्वेषाने गनिमांवर तुटुन पडल्या.
त्याच पावलांवर पाऊल ठेऊन महाराजा यशवंतराव होळकरांनी जुलमी इंग्रजी राजवटीस सळो की पळो करुन सोडले.१७ वेळा रणांगणात इंग्रजांना सपाटुन मार दिला.मराठेशाहीच्या शेवटच्या पर्वातील ते अतुलनीय शौर्याचे प्रतिक होते.
हे सर्व परीपाठ सांगण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्ष.कायमच धनगर द्वेषी असणाऱ्या या पक्षाने जलसिंचनाच्या बाबतीत गोरगरीब शेतकऱ्यांना अतोनात लुबाडले.कॉग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसुन राष्ट्रवाद निर्मिती साठी पक्ष स्थापन करण्यात आला.जाणता राजा म्हणुन स्वतःला संबोधितात त्यांना छञपतीच्या नखाची सर तरी येईल का.छञपतींच्या शासनकाळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद इतिहासात नाही.हेच शरदचंद्र पवार कृषीमंञी असताना शेतकऱ्यांना दिलासा भेटेल असे ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत आणि म्हणे जाणते राजे.मातीतुन आरक्षणाचे लोळ धुळीत उडविणाऱ्या स्व.बी.के.कोकरेंच्या एसटी आरक्षणास बासणात गुंडावले.महादेव जाणकारांनी बारामती परीसर पिंजुन काढताना खा.सुप्रिया सुळेला जेरीस आणले.काही अंशी जाणकर साहेब यशस्वी झाले माञ पवारांनी कपटी राजकारणाने त्यांच्या तोंडचा घास हिरावला.
काल परवा सुभेदारांच्या स्मृतीदिनानिमित्त या जाणता राजाने महाराजा यशवंतराव होळकरांचा फोटो टाकुन अकलेचे तारे तोडलेच परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली जन्मलेल्या बांडगुळांनी देखील पदोपदी धनगर जमातीच्या भावनांशी खेळ खेळत आले.या जाणत्या राजाला महापुरुषांमधील फरक ठाऊक नसावा ही बाब खेदाची.बनावट डॉक्टरेट पदवी मिळवुन छातीठोक पणे मिरवणाऱ्या जितेंद्र आव्हाडाला मुळात ठाण्यात आसरा कोणी दिला याची थोडी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो.
एक तरुण होता,तो दररोज ठाणे रेल्वे स्टेशन वरती पेपर विकायचा.एका भल्या माणसाला त्याची मेहनत भावली त्या भल्या माणसाने त्याला एका चांगल्या ठिकाणी नोकरी लावली.तेथे नोकरी करताना त्या भल्या माणसामुळे त्याला चांगली वागणूक देण्यात आली.खरेतर तो भला माणूस म्हणजे तेथील लोकांच्या मनातला हळवा कप्पा. आपला माणूस.त्या भल्या माणसाचा अर्थातच त्या परिसरात खूप दरारा असे. याच दराऱ्याचा त्या तरुणाने गैरफायदा घेण्यास सुरुवात केली.त्या देव माणसाचा माणूस असल्यामुळे त्याला कोणी काहीच बोलत नसे. निमूटपणे त्याचा अन्याय सहन करीत.एकदा तो भला माणूस त्याच्या कामाच्या ठिकाणी गेला असता त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली कामाच्या ठिकाणी असलेली त्याची गुंडगिरी,अरेरावी पाहून त्या भल्या माणसाचा पारा चढला.पारा एवढा चढला की त्या भल्या माणसाने रागाच्या भरा मध्ये त्या तरुणाच्या कानशिलात लगावल्या.त्या तरुणाला फटके देत त्या ठिकाणी नेले ज्या ठिकाणी तो पेपर विकायचा. हा पेपर चा स्टॉल घेऊन तु तुझ्या मूळ गावी निघून जा पुन्हा ठाण्यात कधीही दिसू नये असे त्या भल्या माणसाने त्यास बजावून सांगितले तो तरुण पुन्हा ठाण्याच्या रस्त्यावर कधीच दिसला नाही.दिसला तो शेवटी त्या साहेबांच्या मृत्यूवेळी. हा सपाटुन मार खाल्लेला तरुण म्हणजे जितेंद्र आव्हाड व त्यांना चोप देणारे ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेब.खरे तर ही औकात ह्या बांडगूळाची. धर्मवीरांचे बोट धरून ज्यांनी राजकारणात प्रवेश केला त्याच या औलादी ने धर्मवीर यांच्या पाठीत खंजीर खुपसला. खरे तर हा जितेंद्र आव्हाड स्वतःला उच्चशिक्षित समजतो तर मग तो इतर जाती धर्माच्या महापुरुषांबद्दल एवढा तिरस्कार का करतो.याला विंचू वगैरे ढसला होता की काय याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
खरे तर या ठाण्यात अनेक उच्चशिक्षित धनगर समाज बांधव आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा त्याला केव्हा जाब विचारला आहे का. इतिहासाच्या पानांना ज्यांनी रक्ताभिषेक घातला, तोच हा धनगर समाज ह्या प्रकरणावर मूग गिळून का गप्प बसला आहे. वारंवार धनगर समाजाला हीन दर्जाची वागणूक देण्यात येते. धनगर समाजातील प्रचंड उदासीनताच या गोष्टीस कारणीभूत ठरत आहे वेळी आपण पावले उचलली नाहीत तर समाजाची फरफट ही अटळ आहे.
धनगर समाजाविषयी व त्यांच्या महापुरुषांविषयी कोणतेही भाष्य करताना त्या गोष्टींची पूर्तता पडताळून पहावी. छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात पेशवाईच्या मांडीला माडी देऊन बसवण्याचा मान ह्या होळकरांना होता हे लक्षात घ्यावे.पेशवाई ची संपूर्ण मदार ही फक्त श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर,अहिल्याआई होळकर व महाराजा यशवंतराव होळकर यांच्या खांद्यावर होती हे इतिहासाने वारंवार स्पष्ट देखील केले आहे.पेशव्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पानिपतच्या महायुद्धात देखील मराठ्यांना सपशेल अपयश मिळाले.दिल्लीचेही तख्त फोडण्याची ताकद ही केवळ होळकरांच्या मनगटांत होती.
शेवटी एकच सांगणे आहे,शंड होण्यापेक्षा गुंड व्हा. होळकरांचा इतिहास वाचाल तरच वाचाल.

जय मल्हार! जय अहिल्या !! जय यशवंत !!!

आपला,
श्री दीपक रमेश होळकर.
मु.पो.बोरगाव बुद्रुक ता. केज जिल्हा बीड.
77 38 69 21 03

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!