महाराष्ट्र

रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था( मुंबई ) व कल्याणकारी संस्था रोहा, तळा, मुरुड यांच्या विद्यामानाने करिअर मार्गदर्शन शिबिर

Spread the love

प्रतिनिधी :- श्री. महेश झोरे

दहावी व बारावी म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. या निर्णायक वळणावर करिअर च्या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. प्रत्येक वेळी सर्वच विद्यार्थ्यांना अपेक्ष एवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळुन ही करिअरच्या विविध वाटा कोणत्या? एखादे क्षेत्र निवडताना त्या बदलची माहिती कशी मिळवावी. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी. यांचे संपूर्ण मार्गदर्शन रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था (मुंबई) व कल्याणकारी संस्था रोहा, तळा,मुरुड यांच्या संयुक्त विदयामानाने ठेवण्यात आलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना मिळाले. रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था (मुंबई) संस्थेचे अध्यक्ष:- मा श्री. जनार्दन रा ढेबे,उपाध्यक्ष- महेश ज. लांबोरे, सचिव- प्रकाश भा. वरक, सह- सचिव- गणेश धा. गोरे, खजिनदार- नरेश स. झोरे, सह- खजिनदार- हरीचंद्र लांबोरे, सल्लागार- मा.श्री.नामदेव झोरे, मा.श्री.चंद्रकांत शळके, मा श्री.धर्मेश वरक, मा श्री. वसंत शिंगाडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व एल्गार सेना रोहा तालुका कार्य अध्यक्ष मा श्री यशवंत होगाडे, कु.दिनेश वरक,सर्व संघटक, सदस्य:- मा श्री.प्रभाकर होगाडे, कैलास ढेबे, संदीप झोरे, राजेश कोकले, संदीप वरक, व संस्थे वरील सर्व उपस्थित सदस्य या सर्वांच्या पुढाकाराने आज दिनांक:- २२/५/२०२२रोजी, मराठी साहित्य संघ, ५वा. मजला. डॉ. भालेराव मार्ग गिरगांव मुंबई-४००००४ येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी करिअरच्या अवघड टप्यावर कोणत्या गोष्टीचा विचार करावा.या विषया वरती करिअर समुपदेशक मा. श्री डॉ. सागर सानप सर m.sc ph.D(chemistry) यांनी तर स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या आसतात, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी. स्पर्धा परीक्षा या क्षेत्रा कडे विद्यार्थ्यांनी का वळावे. तयारी कशी करावी. या विषया वरती अतिशय उत्तम पद्धतीने मा श्री. आदेश शिंदे सरांनी MA. MPHIL. NET(संचालक- श्री- द्रोणाचार्य करिअर अकॅडमी – रोहा- रायगड) उपस्थित विद्यार्थि व पालकांना मार्गदर्शन केले. यांचे संस्थेच्या वतीने मन: पुर्वक आभार!!
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणुन प्रमुख लाभलेले मा. श्री- महेंद्र शेठ दळवी साहेब (आमदार) यांच्या बहु मा. सौ. अदिती ताई अभिराज दळवी मॅडम यांनी वेळात वेळ काडून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले त्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री जनार्दन रा. ढेबे यांच्या वतीने मन: पुर्वक आभार!!
मनोज पाटील ( शिवसेना युवा कार्यकर्ते), डॉ. मंगेश सानप सर (जसलोक हॉस्पिटल), प्रो. माधव आग्री सर (अभिनव कॉलेज भाईंदर), एल्गार सेना रोहा तालुका अध्यक्ष- मा.श्री मनोहर गोरे, नॅशनल गोल्ड मेडल विजेता (weight lifting)कु.बबन झोरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष- विजय जी गोरे , टिटवी शाखा प्रमुख- हरीचंद्र आवकिरकर, सर्व विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित राहुन सहकार्य केल्या बद्दल संस्थेच्या वतीने मन: पुर्वक आभार!!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!