महाराष्ट्र

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे वतीने ओबीसी आयोगाला आरक्षणाबाबत निवेदन सादर

Spread the love

प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांची माहिती

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील नागरीकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते, निवेदने जाणून घेण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी महसूल व नोडल अधिकारी विभाग मा. मोहिनी चव्हाण यांना मेल आयडी द्वारा निवेदन पाठविण्यात आले आहे.

या निवेदनातील मजकुर असा आहे – भारताच्या घटनेतील अन्य मागासवर्गीय जाती जमातींची परिशिष्ठ दोन मध्ये यादी दिली आहे . त्या यादीतील क्रमांक ३२ वर ओरान धनगर असा उल्लेख आहे . तो ओरान हा उल्लेख तो जमात भारताच्या काही भागात राहणारी आहे त्या जमातीबाबत आहे आणी धनगड हा शब्द या देशांत बत्तीस पोट शाखात विखुरलेल्या धनगर समाजासाठी आहे . मुळ धनगर शब्दाचे इंग्रजीकरण करताना शेवटच्या “र” या अक्षराचे “ड” असे रूपांतर झाले आहे . जस ताकारी चे ताकाड़ी, गुरगाव चे गुडगाव , जाखर चे जाखड झाले आहे असा तो धनगर चा धनगड झाला आहे .

” आदरणिय स्व . अटलबिहारी वाजपेयीजी भारताचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी घटनेतील अशा स्वरूपाचे किंवा काना , मात्रा , अनुस्वार वगैरे बदलामुळे ज्यांच्यावर किंवा ज्या समाजावर अन्याय झाला आहे . तो विचारात घेवून प्रशासनाकडून होणारा अन्याय दूर करण्याच्या उद्देशाने सुप्रिम कोर्टाचे सेवा निवृत्त न्यायमुर्ती आदरनिय चलियाजीच्या अध्यक्षतेखाली चुका समाजावून घेवून त्यापैकि योग्य असतील त्या दुरुस्त करण्यासाठी आयोग नेमला होता तो आयोग सन २००२ साली महाराष्ट्रात मुंबईतील सह्याद्रि अतिथी गृहावर आले होते . त्या आयोगासमोर ” महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे” तत्कालीन अध्यक्ष मा . अँड . आर.जी. रूपनवर यांनी हजर राहून धनगर समाजावर कसा अन्याय होत आहे . याचे निवेदन पुराव्यासह कथन करून व लिखित स्वरूपात दिले होते .

आदरनिय चलियाजींनी पुढील दोन वर्षात एकूण तिन वेळा तारखा देवून अँड . आर . जी. रूपनवर यांचे म्हणणे ऐकुन घेवून अर्जातील विनंती योग्य असल्याचे मान्य करून जो अहवाल दिला तो रजिस्ट्रार ऑफ इंडियाकडे पाठवून त्याची त्यांनी छाननी करून घेतली व रजिस्ट्रार ऑफ इंडियाने आयोगाचे म्हणणे रास्त असल्याचे मान्य व जनजाती मंत्रालय भारत सरकारकडे पाठविला भारताचे जन जाती मंत्रालय दर वर्षी आपला अहवाल प्रकाशीत करते सन २००७-०८ च्या अहवालाच्या हिंदी प्रतिमध्ये ३२ क्रमांकावर सुधारित नोंद केली आहे . हिंदी मध्ये ती अशी ३२ ( ओरॉन , धनगर , आणि इंग्रजी प्रतिमध्ये ती ३२ ) Oran Dhangad , अशी आहे . याचा अर्थ हिंदी हि राष्ट्र भाषा असल्यामुळे इंग्रजीतील धनगड व हिंदीतील धनगर हा भाषा शास्त्राचा विषय आहे . त्यामुळे मुळ स्वरूपात बदल मानायचे कारण नाही .

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाज आरक्षणाच्या सोयी सवलती पासुन उपेक्षित राहू नये म्हणून धनगर समाजाचा ओ.बी.सी. मध्ये समावेश करून त्यास ओ.बी.सी.च्या सर्व सवलती लागु केल्या आहेत . त्या समर्पित आयोगाने जशाच्या तशा ठेवाव्यात अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड . राजेंद्र रामचंद्र डांगे यांनी इमेल द्वारा पाठविले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!