महाराष्ट्र

मोबाईलची सततची सवय कालांतराने व्यसन

Spread the love

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत देवगांव देवळी येथे व्याख्यानाचे आयोजन…

अमळनेर प्रतिनिधी

सध्या आधुनिक जगात भ्रमणध्वनीचा सर्रास वापर करत असल्यामुळे तरुण पिढी तिच्या आहारी गेली आहे .मोबाईलच्या अतिवापराने डोळ्याचे कर्करोग असे अनेक आजार सध्या उद्भवत आहे. हातात फोन नसतांना माणूस अपंग बनतो. तिन ते चार तास भ्रमणध्वनी वापरल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतात. माणसाची संवेदना स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होऊ शकते मोबाईलची सततची सवय कालांतराने व्यसन बनते असे देवगाव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये “आजादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमांतर्गत “भ्रमणध्वनीचे दुष्परिणाम” या विषयावर मार्गदर्शन करतांना शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन बोलत होते.
व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के म्हणाले की आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित विविध स्पर्धा आपल्या शाळेत उत्कृष्ट पद्धतीने राबविल्या जात आहेत व त्याला सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत असल्याने समाधान व्यक्त करत भ्रमणध्वनीचे दुष्परिणाम यावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्काऊट शिक्षक एस. के महाजन यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच. ओ .माळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!