महाराष्ट्र

महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री मा. आमदार श्री. सदाभाऊ खोत यांच्या वरील भ्याड हल्ल्याचा रयत क्रांती संघटनेच्या वतीने जाहिर निषेध

Spread the love

महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार मा. सदाभाऊ खोत यांच्यावर काल सोलापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी होवून संबंधितांवर  गुन्हा दाखल करावा अशा अशयाचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्या वतीने वाळवा तालुक्याचे तहसिलदार यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रति केंद्रिय गृहमंत्री मा. नामदार श्री. अमितभाई शहा, महाराष्ट्राचे मा. राज्यपालसो, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. ना. देवेंद्रजी फडणवीससाहेब , सांगली जिल्हा पोलिस प्रमुखसो, इस्लामपूर पोलिस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देते वेळी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व नेर्ले गावचे माजी सरपंच मा. श्री. लालासाहेब पाटील , वाहतुक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. बजरंग भोसले, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. विनायकराव जाधव, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. मोहसिन पटवेकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण उथळे, श्री. सर्फराज डाके, जितेंद्र सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष लालासो धुमाळ,यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनातील मजकुर असा काल दिनांक १६ मे रोजी शेतकरी नेते, माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार मा. श्री. सदाभाऊ खोत हे सद्या महाराष्ट्रभर जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या माध्यमातून राज्यभर संपर्क दौरा सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात या दौऱ्याला व होणाऱ्या जाहिर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असुन महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या समस्या समाजावून घेतल्या जात आहेत. शेतकरी नेते मा. आमदार श्री. सदाभाऊ खोत हे वारंवार राज्य सरकारच्या अन्यायकारक भूमिकेबाबत सर्व सामान्य लोकांच्या बाजूने सतत बोलत असतात. याचा राग आघाडी सरकारच्या मनात सतत खदखदत असतो. यामुळेच महाराष्ट्रभर आमदार सदाभाऊ खोत यांचे वाढते वर्चस्व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला पेलत व बघवत नाही या चिडीपोटी सोलापूर येथे त्यांच्यावरती भ्याड हल्ला झाला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना किंवा राज्यात सद्या सुरू असलेल्या चुकिच्या पध्दतीवर कोण खरे बोलेल या नेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्क केला जात आहे . असा भ्याड हल्ला करणे व दादागिरीची भाषा वापरणे चुकिचे असुन या भ्याड हल्ल्याचा तपास व्हावा व हल्ला करणाऱ्या गुंडावरती कडक कारवाई करावी. यापुढे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार श्री. सदाभाऊ खोत यांच्याबाबतीत कोणताही अनुचित प्रकार झाल्यास महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते स्वत बसणार नाहीत व पुढे होणाऱ्या सर्व गोष्टीची जबाबदारी ही राज्य सरकारची राहिल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!