महाराष्ट्र

२४ व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीच्या रोमहर्षक व अटीतटीच्या सामान्यांनी क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

Spread the love

इस्लामपूर दि.११ प्रतिनिधी
इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत सुरू असलेल्या २४ व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीच्या रोमहर्षक व अटीतटीच्या सामान्यांनी क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सकाळी व रात्री उशिरापर्यंत पुरुषांचे १२ व महिलांचे १० सामने खेळविण्यात आले. भारतीय व्हॉलीबॉल महासंघ व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनने,युवा नेते व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सहा दिवसाच्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. पहिल्या दिवशीच्या सामन्यात मुलींच्या महाराष्ट्र संघाने झारखंडला सरळ ३ सेटने मात दिली. मात्र पुरुषांचा महाराष्ट्र संघ केरळ संघाकडून ३-१ पराभूत झाला आहे.
पुरूषांच्या सामन्यात कर्नाटकने ओरिसाला,उत्तर प्रदेशने पाँडिचेरीला,आंध्र प्रदेशने गुजरातला,दिल्लीने बिहारला, राजस्थानने झारखंडला,पंजाबने हिमाचल प्रदेशला उत्तराखंडने पश्चिम बंगालला,उत्तर प्रदेशने गुजरातला आणि राजस्थानने मध्य प्रदेशला सरळ तीन सेटनी पराभूत केले. केरळने महाराष्ट्राला ३-१ सेटने,तेलंगणाने मध्य प्रदेशला ३-१ सेटने, चंदीगडने जम्मू काश्मिरला ३-२ सेटने मात दिली.
मुलींच्या सामन्यात महाराष्ट्रने झारखंड ला,उत्तर प्रदेशने दिल्लीला,पाँडिचेरीने उत्तराखंडला,आंध्र प्रदेशने ओरिसाला, राजस्थानने बिहारला,चंदीगडने कर्नाटकला सरळ तीन सेट मध्ये पराभूत केले. तर ओरिसाने तेलंगणाला ३-२ सेटने, गुजरातने आंध्र प्रदेशला ३-१ सेटने मात दिली. काही संघांना पुढे वाटचाल मिळाली आहे.
जॉयब्रता सेनगुप्ता (पश्चिम बंगाल), व्ही.के.सिंग (उत्तर प्रदेश),पंकज पतियाळ (हिमाचल प्रदेश),अशोक दीक्षित (महाराष्ट्र), बी.के.सिंग (उत्तर प्रदेश), दिलीप कुमार (बिहार) यांनी मुलांच्या सामान्यांची,तर आर.एस.देबेदी (मध्य प्रदेश), रामानंद गोसावी (महाराष्ट्र),राजेश शानबाग (महाराष्ट्र),विजय माणिकम (महाराष्ट्र),चारु नाईक (जम्मू काश्मिर) यांनी मुलींच्या सामन्यांची पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

आजचे सामने-
आज (गुरुवारी) मुलींच्या महाराष्ट्र संघाचा सामना उत्तराखंडच्या संघाशी होणार आहे. तर मुलांचा महाराष्ट्र संघ तामिळनाडूस भिडणार आहे. आजही पुरुषांचे १३ सामने, तर मुलींच्या संघाचे १० सामने होणार आहेत. सकाळी ७.३० ते दुपारी १२ तसेच सायंकाळी ५ ते रात्री आजचे सामने संपे खेळ होणार आहे. इस्लामपूर (जि.सांगली) येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत सुरू असलेल्या २४ व्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विविध सामन्यातील क्षण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!