क्रीडा व मनोरंजन

मुंबईत विनाशुल्क कबड्डी प्रशिक्षण शिबीर.

Spread the love

मुंबई :- श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ-भायखळा यांच्या विद्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईतील मुले व मुलींकरिता विनाशुल्क कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे दि. २२ ते २९ मे २०२२ या कालावधीत सायं. ५-०० ते ८-०० या वेळेत हे शिबिर घेण्यात येईल. या शिबिरात १० ते २२ या वयोगटातील मुला-मुलींना सहभाग घेता येईल. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतर राष्ट्रीय खेळाडू मेघाली कोरगावकर-म्हसकर, मुंबई पोलीस संघाचे प्रशिक्षक एकनाथ सणस, राष्ट्रीय प्रशिक्षक सुहास जोशी, राष्ट्रीय खेळाडू अपर्णा शेट्टे यांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन लाभणार आहे. तर बेंगळुरू बुल्सचे फिटनेस ट्रेनर रोहित यादव हे शिबिरार्थींना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देणार आहेत.
कबड्डी खेळातील कौश्यल्य(स्कील्ड), लवचिकता(स्ट्रेंथ), गती(स्पीड) वाढविण्याकरिता ऍडव्हान्स प्रशिक्षण, आहार(डाएट) आणि वेळेचे नियोजन(प्रोग्रामिंग) याचे मार्गदर्शन, शिवाय नामांकित राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन हे या शिबिराचे वैशिष्ट ठरणार आहे.या शिबिरात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रवीण शिंदे-9819315911, एकनाथ सणस-7977259166 किंवा अपर्णा शेट्टे-9819233464 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत. मुंबईतील जास्तीतजास्त उदयोन्मुख खेळाडूंनी या विनाशुल्क शिबिरात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री स्वामी समर्थ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी या परिपत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमाना कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!