त्रिपुरा राज्याचे सचिव मा. श्री किरण गित्ते साहेब IAS यांच्यावर देशभरातुन शुभेच्छांचा वर्षाव !

परळी( प्रतिनिधी)
परळीचे भूमिपुत्र तथा त्रिपुरा राज्याचे सचिव : सार्वजनिक बांधकाम, उद्योग, कुटुंब कल्याण ,वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान ,पर्यटन विभागाचे यांचा वार शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात त्रिपुरा येथील माता त्रिपुरा सुंदरी दर्शन घेऊन आरती पुजा करून शासकीय निवासस्थानी त्रिपुरा येथे त्रिपुरा राज्यातील सहकारी मित्र परिवारा तील कुटुंबातील सर्व सदस्यांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
परळीचे भूमिपुत्र मा श्री किरण गित्ते साहेब IAS सचिव: त्रिपुरा सरकार यांच्यावर वाढदिवसानिमित्त परळी, अंबाजोगाई ,माजलगाव, बीड, आष्टी ,पाटोदा ,गेवराई ,धारूर, सोनपेठ, गंगाखेड, परभणी, हिंगोली ,नांदेड, लातुर ,औरंगाबाद ,जालना, उस्मानाबाद , तुळजापूर, कोल्हापूर ,सोलापूर, पंढरपूर , आळंदी देवाची, सांगली, सातारा पुणे ,मुंबई, नागपूर ,नाशिक अमरावती, वर्धा, धुळे , यवतमाळ दिल्ली तिरुपती व अनेक राज्यांतुन सह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याभरातून मित्र परिवार व राज्याचे IAS ,IPS,CEO सर्व अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र राज्याचे अनेक विभागाचे राज्यचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री ,खासदार ,आमदार , सचिव,संचालक, उपसचिव उपसंचालक आयुक्त, यांच्यासह त्रिपुरा सह देशभरातील आपल्या मित्र परिवाराकडून आज मा श्री किरण गित्ते IAS यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून मा श्री किरण गित्ते साहेब त्रिपुरा राज्याचे सचिव असून सुद्धा आपले महाराष्ट्र राज्यातील व जन्मभूमि तील मित्र परिवार नातेवाईक वरिष्ठ अधिकारी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून आज दिवसभर रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आपल्या सर्वांच्या व्हाट्सअप, फेसबुक ,इंस्टाग्राम, मोबाईल, फोन ,प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शुभेच्छांनी अक्षरशः भारावून गेलो असुन आपल्या शुभेच्छांमुळे अशीच मला शासकीय सेवेमध्ये काम करण्याची ऊर्जा मिळावी ही प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करतो असे उद्गार IAS किरण गित्ते यांनी काढले.