क्रीडा व मनोरंजन

शिराळा तालुका पत्रकार संघ व कोटेश्वर महिला मंडळ यांच्या विधायक उपक्रमांमुळे सामान्यांना दिलासा – डॉ.प्रवीण पाटील.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तालुका पत्रकार संघ व कोटेश्वर महिला मंडळ यांनी आरोग्य शिबीरा सारखे उपक्रम घेउन सामान्य लोकांना दिलासा दिला असून गोर गरीब जनतेसाठी या आरोग्य शिबीरा मुळे पहिल्या टप्प्यात होणारे आजारपण निदर्शनास येत आहे.मंडळाने उचललेले पाऊल हे निश्चितच अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न शिराळा तालुका पत्रकार संघ ,कोटेश्वर महिला मंडळ आणि पंचायत समिती आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उत्तघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने,डॉ.जे.डी.राजमाने,मार्गदर्शक, पत्रकार सुमंत महाजन,रविंद्र कदम, मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुशीला कुरणे, डॉ.जांभळे,समुदाय अधीकारी श्रीमती रुपाली शिंदे आदी प्रमुख उपस्थितीत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
या वेळी बोलताना आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण पाटील म्हणाले की,समाजातील सर्व थरांतील आणि गरजू लोकांपर्यंत प्रभावी परिणामकारक आरोग्य सुविधा देण्याचे काम आरोग्य विभागाच्या कडून होत आहे.
या वेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने म्हणाले की,बदल्यात काळात माणसाची जीवन शैली बदलत आहे.अंगमेहनितीची कामे कमी झाली आहेत त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून त्यासाठी आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.या पुढे ही पत्रकार संघ व महिला मंडळाने पुढाकार घेउन आरोग्य शिबीर घेउन इतर लोकांना ही लाभ मिळवून देण्याचे काम करावे.
सामान्यांना उपचार मिळावे यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात 100 हुन अधिक नागरिकांची ब्लड शुगर,ब्लड प्रेशर,हिमोग्लोबिन कॅल्शियम आदींसह मोफत प्राथमिक तपासणी तज्ञ डॉक्टरांनी या वेळी केली.शिबिरात विशेषतः उपस्थितीती महिला व जेष्ठ नागरिकांची होती.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात उद्योजिका व मंडळाच्या संचालिका सुखदा महाजन म्हणाल्या आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याची हेळसांड होत आहे.विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबिन,लोह,कॅल्शियम याची मोठ्या प्रमाणात कमतरता असते.त्या साठी सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे.समुदाय अधिकारी श्रीमती रुपाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी पत्रकार सुभाष कदम, वरीष्ठ आरोग्य विस्तार अधिकारी डी.एस.चिलवंत,मंडळाच्या उपाध्यक्षा सरोजिनी कदम,सचिवा संगीता खटावकर,ऍड,स्मिता खुर्द,नूतन साठे, नंदिनी काटकर ,कल्पना खबाले, रुपाली गुरव,कल्पना ठोंबरे ,लॅब टेक्निशियन पूनम पाटील ,आरोग्य सहाय्यक एम.डी.पाटील, बागल ,यू.डी.गायकवाड आदींसह आशा, आरोग्य सेविका , कर्मचारी उपस्थितीत होते.आभार प्राजक्ता कुलकर्णी यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!