ताज्या घडामोडी

इस्लामपुर येथील दुकानात दोन अज्ञात महीला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे उददेशाने येवुन चोरी करणाऱ्या महिलांना केले जेरबंद

Spread the love

हुकमीचंद कोठारी वय ६५ वर्षे रा. गांधी चौक इस्लामपुर यांची कोठारी गोल्ड सिल्वर ज्वेर्लस गांधी चौक इस्लामपुर येथील दुकानात दोन अज्ञात महीला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे उददेशाने येवुन दुकानातील काचेच्या काउन्टर वरील सोन्याची दागिने दाखवण्याचे बहाण्याने हातचालाकी करुन वरील वर्णनाचा माल चोरी करुन गेले होते. त्यानंतर दुकानमालक यांनी इस्लामपुर पोलीस ठाणेस येवुन गुन्हा दाखल केला होता. त्याअनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपुर श्री. मंगेश चव्हाण सो व श्री. प्रदीप सुर्यवंशी पोलीस निरीक्षक सो इस्लामपुर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्या उघडकिस आणने कामी पथकास योग्य त्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे इस्लामपुर पोलीस ठाणे कडिल १) सहा.पो.नि. श्री हरीषचंद्र गावडे २) पोउपनि/सागर गायकवाड, ३) पोहेकॉ/८१९ दिपक ठोंबरे ४) पोकॉ/अलमगीर लतीफ ५) सतिश खोत ६) वर्षा मिरजकर यांनी गोपनीय माहीती काढीत आरोपीत महीला नामे १) मुमताज नजिर शेख वय ६२ वर्षे २) नाजिया वसिम शेख वय ३३ वर्षे दोघी रा. नई जिंदगी अमन चौक सोलापुर जि. सोलापुर यांना सोलापुर येथे जावुन शिताफितीने गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली अ त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानतंर त्यांचेकडे कौश्यल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी सांगली जिल्हायातील इस्लामपूर व विटा या ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे केलेची कबुली दिलेली आहे. तरी त्यांचेकडुन एकुण ०२ गुन्हे उघडकीस आलेले असुन ते खालीलप्रमाणे
इस्लामपूर पोलीस ठाणे जि. सांगली
विटा पोलीस ठाणे जि. सांगली
सदर गुन्हयातील आरोपीत महीला यांचेकडुन वरील गुन्हे उघडकीस आले असुन त्याचेकडुन एकुण २,५८,०००/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त करणेत आला आहे. तरी सदरची आरोपी या सराईत गुन्हेगार असुन यांचेवर यापुर्वी आशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेबाबत माहीती मिळाली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सागर गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!