ताज्या घडामोडी

माजी खासदार विजय पाटील व नामदर अनिल पाटील यांच्या हस्ते न्यूज 18 महाराष्ट्र चनल च्या उद्घाटन!!

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

प्रसंगी शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीला,सच्ची पत्रकारिता हीच संजीवनी!!
संदीप घोरपडे
सुरुवातीला न्यूज 18 महाराष्ट्र या चॅनलचे उमेश काटे यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले प्रस्ताविकात साप्ताहिक प्रजाराज्य त्यानंतर शिवशाही फाउंडेशन या मार्फत तसेच दैनिक सकाळचे पत्रकारिता व आता न्यूज 18 महाराष्ट्र हे पोर्टल चैनल सुरू करीत असल्याबाबत उल्लेख प्रास्ताविकात त्यांनी केलं त्यासोबत कोरोना काळात आई-वडील गेल्याने ते भावनिक होऊन त्यांचे डोळे भरून आलेत आमदार चिमणराव पाटील व माजी खासदार विजय नवल पाटील यांच्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो परंतु ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत असे सद्भावना त्यांनी व्यक्त केली

न्यूज 18 महाराष्ट्र , आवाज महाराष्ट्राचा या न्यूस पोर्टलच्या शुभारंभा वेळी अनेक वेळा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने परखड मत व्यक्त करणारे संदीप घोरपडे यांनी आजच्या एकूणच पत्रकारितेवर उपस्थितांना हळुवार चिमटे काढत गंभीर विषयाकडे लक्ष वेधून विचार करण्यास भाग पाडले आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी उमेश काटे व जयेश काटे बंधूंच्या कल्पनेतून न्यूज 18 या न्यूज पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच ज्यांच्या हस्ते न्यूज पोर्टलचे उद्घाटन झाले ते माजी दळणवळण मंत्री विजय नवल पाटील ,आमदार चिमणराव पाटील, तिलोत्तमा पाटील,अड ललिता पाटील ,राजू महाले सर, डॉ बी एस पाटील, उमेश पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभाला अमळनेर शहरातील व तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी विजय नवल पाटील यांनी पत्रकारितेची पात्रता किती मोठी असते हे उदाहरण दाखल उपस्थितांना सांगून स्वानुभव कथन केले यात पत्रकारितेच्या अनुपस्थितीने लोकशाही खिळखिळी होऊ पाहत आहे असे सांगितले उमेश काटे व जयेश काटे हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहे असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या
अनिल पाटील मंत्री यांनी आपल्या जीवनात पत्रकारांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगून शुभेच्छा देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
या पोर्टलच्या शुभारंभ प्रसंगी संदीप घोरपडे यांनी आजची पत्रकारिता यावर कमीत कमी शब्दात अत्यंत चपखल असे भाष्य केले त्यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर दैनिक केसरी यासह अनेक पत्रकारांनी राजकारणात किंवा साहित्य क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले याची उदाहरणे दिली आजच्या पत्रकारितेत नेमके पत्रकारांनी कोणते प्रश्न उचलावेत त्यात याला जबाबदार कोण याचे उत्तर काय हे कुठे घडले हे केव्हा घडले हे कसे घडले याचा अर्थ काय असे निर्भीड प्रश्न विचारून जनतेला जागृत करणे हे काम आहे आपण कोणत्याही पक्षाची बाजू न घेता आपण सत्याची बाजू घेऊन जनतेला त्यांचे काम करू द्यावे
पत्रकारितेचा आपला बाणेदारपणा आपल्या लिखाणातून जनतेच्या हिताचे काम होईल असे लिखाण आपल्या हातून व्हावे जेणेकरून आपल्याला लोकशाहीच्या या प्रवाहात कोणी लाचार म्हणणार नाही याचे भान असायला हवे.तसे पाहता आज आपल्याला अत्यंत सुपीक अशी भूमी प्रामाणिक पत्रकारांना उपलब्ध आहे उदाहरणार्थ संपूर्ण देशभर विरोधी पक्षीयांना अजिबात स्थान न देता फक्त सत्ताधारी लोकांना त्यांच्या भल्या बुर्या कामांनाच लोकांपर्यंत पोहोचविणे असा पक्षपातीपणा लोकांच्या सहज लक्षात येतो इंडिया आघाडीने अर्णव गोस्वामी
शिव अरुर,अदिती त्यागी,अशोक श्रीवास्तव,प्राची पराशर,आनंद नरसिम्हा,अमन चोप्रा,नवी का कुमार,सुधीर चौधरी,अमित देवगण रुबिका लियाकत,गौरव सावंत,चित्रा त्रिपाठी,सुशांत सिन्हा
यांच्यावर घोषित असहकार म्हणजेच अघोषित बहिष्कार टाकलेला आहे कारण आजकाल इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे त्या कॅमेऱ्याच्या पिंजऱ्यात विरोधी पक्षातील राजकारणी प्रवक्त्याला घ्यायचे आपणच आरोप करायचे आपणच वकिली करायची आपणच न्यायाधीश होऊन त्यांना शिक्षा देखील सुनवायची अशाप्रकारे मीडिया लिचिंग सुरू आहे ज्याप्रमाणे मोबलीचिंग हा अघोरी प्रकार आहे त्याचप्रमाणे हा देखील अत्यंत अश्लागघ्य प्रकार आहे पत्रकारितेने आपल्या लक्षात आलेले वास्तव फक्त जनतेसमोर मांडावे निर्णय जनतेला घेऊ द्यावा ही खरी पत्रकारिता अनेक आरोप झालेले नेते सत्ताधारी पक्षात सामील होताच मीडियाचे लक्ष त्याकडून हटते व केंद्रीय सत्तेला आव्हान देणारे पंजाबचे भगवंत सिंग मान पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी कर्नाटक मधील सिद्धरामय्या व डिके श्रीवास्तव तामिळनाडू मधील स्टैलीन किंवा केरळ सरकार अथवा महाराष्ट्र मधील महाविकास आघाडी यांना केंद्र सरकार खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करताना मीडिया तिकडे साफ दुर्लक्ष करते याचाच अर्थ ते सत्तेच्या लाभार्थ्यांपैकी एक आहेत सरकारने केलेल्या दुर्दैवी घटनांकडे दुर्लक्ष मीडिया देखील करतोय उदाहरणार्थ मणिपूर मधील कुकी समाजावर त्यांच्याच राज्यातील मैतेयी बांधव अत्याचार करताना भान सोडून दोन महिलांना नग्न धिंड काढतात मोठा समुदाय बलात्कार करून भावाला वडिलांना ठार मारतात बलात्कार करून त्या महिलेला देखील ठार करण्याचा प्रयत्न करतात आणि यावर आपल्या देशाचे पंतप्रधान ब्र शब्द देखील काढत नाहीत त्यांचीच री ओढत इलेक्ट्रॉनिक मीडिया यावर भाष्य करीत नाही एवढेच नाही तर ऑलिम्पिक पदक विजेत्या महिलांना जिंकून आल्यानंतर मेजवानी देणारे पंतप्रधान मीडिया दिवसभर दाखवत होते त्याच वेळेचे पंतप्रधानांचे वाक्य आप मेरा परिवार हो मात्र याच साक्षी मलिक विनेश फोगाट व इतर महिला खेळाडू भारतीय जनता पार्टीचे खासदार व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्या विरोधात अनेक दिवस टाहो फोडून त्यांच्या विषयी तक्रारी नोंदवत होते त्या नोंदविल्या जात नव्हत्या या महिलांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा यथा सांग प्रयत्न सरकारी अधिकाऱ्यांकडून झाला तेव्हा मात्र सरकारमधील एकही मंत्री या महिलांच्या सन्मानासाठी बाहेर आला नाही व मीडियाने देखील या ऑलिंपिक विजेत्या महिलांची दखल घेतली नाही ही गोष्ट लज्जास्पद होती एवढेच नाही तर देशभरातील शेतकरी संघटनांनी प्रचंड मोठ्या संख्येने 13 14 महिने चालविलेले आंदोलन मीडियामध्ये 13 14 सेकंद देखील दिसू शकले नाही हा देखील लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा पराभव आहे आणि म्हणून बुलेट ट्रेनच्या वेगाने पत्रकारितेवरील विश्वास ढासळत गेला अशा काळामध्ये आमच्या अंमळनेर शहरातील सर्व पत्रकार बांधवांना एक उत्तम संधी चालून आलेली आहे जिकडे तिकडे खोट्याचा बोलबाला चालू असताना साने गुरुजींच्या पवित्र भूमीतून खरी भूमिका मांडण्याची संधी आज आमच्या पत्रकार बांधवांना चालून आलेली आहे ट्रक ड्रायव्हर लोकांच्या संपा दरम्यान उत्तर प्रदेश मधील एक कलेक्टर रागारागाने एका ट्रक ड्रायव्हरला तो आपली भूमिका मांडत असताना रागारागाने म्हणाले
क्या औकात है तुम्हारी
तेव्हा त्या सामान्य माणसाने भल्या भल्या विचारवंतांनाही सूचना नाही असे बाणेदार उत्तर दिले
यही तो हमारी लढाई है की
हमारी कोई औकात नही
अशी आपली स्वतंत्र ओळख करण्यासाठी मी उमेश काटे जयेश काटे यांच्यासोबत अंमळनेर आतील सर्व पत्रकारांना यानिमित्ताने शुभेच्छा देतो की आपल्या आजूबाजूला जो शिक्षणाचा बाजार मांडलाय तीर्थक्षेत्रांची उदात्तीकरण सुरू आहे सर्व संविधानिक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे लोकशाहीचे विद्रूपीकरण होताना चर्चेविना विधेयक मंजूर करताना राज्यसभा लोकसभा अथवा विधानसभेतील पत्रकार कक्ष सुना सुना होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थारा नाही महिलांना सन्मान नाही बेरोजगारांना रोजगार नाही राजकीय विधी निषेध न बाळगता सत्ता बदल अथवा पक्षातील फोडाफोडींना खऱ्या अर्थाने जनतेसमोर येऊ दिले जात नाही तर आम्हाला यानिमित्ताने एक उत्तम संधी चालून आली आहे की आम्ही तटस्थपणे गोष्टी सांगणार दाखवणार व जनतेला निर्णय घेऊ देणार आम्हीही ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीडियाला गोदी मीडिया अशी शिवी हसडली जाते त्यापासून दूर जात आमचा एक प्रकारे आदरयुक्त दबाव निर्माण करण्यासाठी ही संधी चालून आली आहे या संधीचे सोने नक्कीच दोन्हीही काटे बंधू व त्यांचा पत्रकारितेतील मित्रपरिवार यानिमित्ताने करतील असा मला आशावाद आहे पुन्हा एकदा आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
सामान्यांचे सुटेल कोडे
आपल्यातील एक
संदीप घोरपडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!