ताज्या घडामोडी

आंधळी येथे आदर्श माता पुरस्कार व आरोग्य शिबिर संपन्न

Spread the love

आंधळी ता पलूस येथे कै. सौ. राजाक्का बजरंग मगदूम यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त आंधळी गावात आदर्श माता पुरस्कार व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री डॉक्टर दिलीप मगदूम व श्री सुनील डॉक्टर सुनील मगदूम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड,तर प्रमुख पाहुणे म्हणून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अरुण घोडके सर,पत्रकार विलासराव कोळेकर उपस्थित होते. यावेळी आदर्श माता पुरस्कार आनंदराव जाधव मंगल उत्तम शिंदे व राजाक्का भास्कर मस्के यांना या वर्षीचा आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदर्श माता पुरस्कार गेली चार वर्षे सलग आयोजित करण्यात येत असून आंधळी गावातील आदर्शवत मातांना पुरस्कार प्रधान करण्यात येतो.
तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते यामध्ये मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाते या यावर्षीएकूण 100 लोकांची आरोग्य तपासणी तसेच 200 पेक्षा जास्त लोकांची डोळे तपासणी व चष्मे देण्यात आले अनेक लोकांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले तसेच 500 पेक्षा जास्त टू पेस्ट वाटप करण्यात आले. यावेळी तासगाव तालुक्याचे माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील गिरीश गोंधळ आंधळी गावचे सरपंच अमित चव्हाण चेअरमन गणेश माने प्राध्यापक पी एन पाटील सर, व आदी ग्रामस्थ व नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!