ताज्या घडामोडी

अविरत परिश्रम केल्यास डोंगरी भागातील विद्यार्थी यशस्वी होतील ~सुधीर बंडगर

Spread the love

डोंगरी , दुर्गम , जंगल भागातील विद्यार्थी खेळामध्ये प्राविण्य मिळवून शासकीय नोकरभरती तसेच पोलीस व सैन्यदलामध्ये भरती होऊ शकतात. त्यासाठी शालेय दशेत ध्येय निश्चित करणे महत्वाचे आहे. व आपल्या या ध्येय प्राप्तीसाठी अविरत परिश्रम केल्यास डोंगरी भागातील विद्यार्थी यशस्वी होतील असे प्रतिपादन क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांनी केले.
शित्तूर ( ता. शाहुवाडी ) येथील वारणा माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ” खेळाचे महत्व व करीअर मार्गदर्शन ” या विषयावर आयोजीत करण्यात आलेल्या व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले डोंगरी भागातील विद्यार्थी काटक , चपळ व कष्टाळू आहेत . या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द ठेऊन अथक परिश्रम केल्यास स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवून अधिकारी पदा पर्यंत ते पोहचू शकतात. डोंगरी , जंगल भागातील सर्वसामान्य , शेतकरी कुटुंबातील अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. गांधी विद्यालय व डोंगरी ग्रंथालयाच्या वतीने आम्ही मोफत करीअर मार्गदर्शन करत आहोत. डोंगरी ग्रंथालयाच्या वतीने पोलीस ,सैन्यदल , एम. पी. एस. सी. , वनरक्षक , वनअधिकारी पदासाठी लागणारी पुस्तके आम्ही मोफत देत आहोत. तसेच विद्यालयाच्या क्रीडाविभागाच्या वतीने मोफत मैदानी परीक्षा व धावणे प्रशिक्षण मोफत देत आहे. डोंगरी , दुर्गम , जंगल भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनोगतात श्री. यु. आर. कोळी सर म्हणाले क्रीडा शिक्षक सुधीर बंडगर यांचे डोंगरी भागातील शैक्षणिक , सामाजिक , क्रीडा विषयक कार्य आदर्शवत आहे. त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी सध्या शासकीय पोलीसदल , सैन्यदल व इतर पदावर कार्यरत आहेत. डोंगरी भागातील खेळाडू राज्य , राष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. यावेळी शिक्षिका सौ. पुनम पाटील , प्रकाश पाटील तसेच डोंगरी , जंगल भागातील सर्व विद्यार्थी , विद्यार्थीनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!