क्रीडा व मनोरंजन

स्पोर्टींग क्रिकेट क्लबचा दणदणित विजय अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे – ठाण्याच्या स्पोर्टींग क्रिकेट क्लबने दादरच्या स्पोर्टींग युनियन संघाचा ८ विकेट्सनी दणदणित पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेत मोठा विजय नोंदवला. सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रोमा तांडेल आणि निव्या आंब्रेच्या माऱ्यासमोर स्पोर्टींग युनियनचा डाव ७५ धावांवर आटोपला. प्रार्थना साळगावकरचा (१४) अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विशेष म्हणजे स्पोर्टींग युनियनच्या एकूण धावसंख्येत २५ अवांतर धावांचा समावेश होता. स्पोर्टींग युनियनच्या फलंदाजांवर अंकुश ठेवताना स्थानिक स्पोर्टींग क्रिकेट क्लबच्या रोमा तांडेलने १० धावांमध्ये ३ विकेट्स मिळवल्या. तर निव्या आंब्रेने ९ धावांमध्ये २ विकेट्स मिळवल्या. स्पोर्टींग क्रिकेट क्लबने डावातील ८ व्या षटकातच ७८ धावा करत मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. निधी डावाडाने २४ आणि क्रितिका कृष्णम्माचारीने नाबाद १० धावा केल्या. अन्य लढतीत पय्याडे क्रिकेट क्लबने यजमान दैवेज्ञ क्रिकेट क्लबवर मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमानांनां २० षटकात केवळ ५९ धावपर्यंत मजल मारता आली. विजयी संघाच्या श्रद्धा सिंगने ४ षटकात २ निर्धाव षटके टाकत फक्त ६ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स मिळवल्या. गौरी बाजिरास (१६) हि एकटीच दुहेरी धावा करणारी फलंदाज ठरली. क्रितिका यादवने नाबाद २४ धावा करत संघाला विजय मिळून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!