ताज्या घडामोडी

गिरजवडे येथे सीसीटीव्ही कॅमेराचे उदघाटन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी 

गिरजवडे (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी गावातील प्रमुख चौकात लोकवर्णीतून बसविण्यात आलेल्या सी. सी. टिव्ही कॉमेऱ्यांचे उद्घाटन केले. यावेळी आमदार मानसिंगभाऊ म्हणाले, गिरजवडे सारखे डोंगराळ भागातील गावातही काळाची गरज ओळखून लोकवर्णीतून नागरीकांनी सी. सी. टि. व्ही. बसविले, ही अभिमानास्पद बाबा आहे. वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षितता, अपघात आदी प्रसंग ओढावल्यास या यंत्रणेचा वापर करून त्याचा शोध घेता येईल. ही आधुनिक यंत्रणा बसविणारे गिरजवडे शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील पहिलेच गाव आहे. याप्रसंगी सरपंच ज्योती पाटील, पोलिस पाटील युवराज पाटील, माजी सरपंच आनंदा शेळके, लक्ष्मण दरगडे, सचिन देसाई, अरविंद पाटील, शिवाजी मोंडे, रमेश मुळीक, हणमंत मुळीक, मोहन मुळीक, सुनिल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य निलेश यटम, आप्पासो शेळके, जगन्नाथ मोंडे, जगन्नाथ कवडे, बाळासो मुळीक आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!